Prasad Oak: अलिकडे मराठी सिनेमांचं बजेटही कोटींची उड्डाणं घेताना दिसत आहे. आता हिंदी निर्मात्यांचाही मराठी सिनेमांमध्ये इंट्रेस्ट वाढताना दिसत आहे. हिंदीत मराठी चेहरे खूप आधीपासनं दिसायचे,मात्र आता मराठी सिनेमातही अमराठी चेहरे दिसू लागले आहेत.
अर्थात ही एक चांगली गोष्ट घडतेय. पण आजही इथे असे निर्माते-लेखक-दिग्दर्शक आहेत ज्यांच्याकडे उत्तमातील उत्तम कथा आहे. पण त्याला पडद्यापर्यंत आणण्यासाठी जो डोंगराएवढा पैसा उभारावा लागतो त्याची कमतरता भासतेय.
किंवा एखाद्या सिनेमाला बडे-बडे पुरस्कार मिळतात खरं,अगदी राष्ट्रीय पुरस्कारही ...पण तो थिएटरमध्ये प्रदर्शित करणं किंवा त्याचे प्रमोशन करणं याला जो पैसा लागतो तिथे निर्माता कमी पडला की पुढे त्या सिनेमाचं काहीच होत नाही, आणि त्या कारणानं एखादी दर्जेदार कलाकृती डब्यात कशी जाते याची अनेक उदाहरणं मराठीत आजपर्यंत आहेत.(Prasad Oak New Post, Say,'Good News For Marathi Industry')
सरकार सबसिडी देतं सिनेमाला, पण त्याची रक्कम फारशी हवी तेवढी मोठी नाही,किंवा ती वेळेत मिळणं हा देखील महत्त्वाचा भाग असतो. असे अनेक प्रश्न आहेत ज्यांच्यामुळे आजही मराठी सिनेमा अनेकदा अंधारात चाचपडतो. यासंबंधित नुकतंच मराठी इंडस्ट्रीतील काही मंडळींनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. तेव्हा मोठे निर्णय या बैठकीत झाले . त्याची सविस्तर माहिती प्रसादनं आपल्या पोस्टमधून दिली आहे. नेमक्या काय काय गोष्टी सरकारनं मराठी मनोरंजनसृष्टीसाठी मान्य केल्यात,चला थोडक्यात पाहूया.
प्रसाद ओकनं एक पोस्ट करत आपल्या त्या बैठकीविषयी आणि बैठकीतील निर्णयाविषयी लिहिलं आहे. त्यानं आपल्या त्या पोस्टसोबत जोडलेल्या नोटमध्ये लिहिलं आहे,"मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत आनंदाची बातमी". काल मा.श्री.सुधीरजी मुनगंटीवार ( सांस्कृतिक आणि वन मंत्री, महाराष्ट्र राज्य ) साहेबांना भेटलो.
नाटक, चित्रपट, मालिका सर्व क्षेत्रातल्या अनेक अडचणी त्यांनी समजून घेतल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी चित्रपटाला जर "राष्ट्रीय पुरस्कार" मिळाला तर त्याला दुप्पट सबसिडी मिळायला हवी अशी मागणी मी केली असता साहेबांनी अत्यंत मोठ्या मनानी त्वरित हि मागणी मंजूर केली आणि एका आठवड्यात GR काढण्याचे आदेश दिले.
तसेच OVERALL सबसिडी ची रक्कम सुद्धा वाढवायचा प्रस्ताव त्त्यांच्यासमोर मांडला आहे. आणि थकीत सबसिडी लवकरात लवकर देण्याचाहि प्रस्ताव मांडला गेला..त्यालाही त्यांचा सकारात्मक प्रतिसाद होता. या निर्णयामुळे मराठी चित्रपट निर्मात्यांना बळ मिळेल अशी आशा वाटते.
नाट्यगृहांच्या दुरावस्थेबद्दल, मल्टिप्लेक्स मधल्या prime time shows बद्दल सुद्धा चर्चा झाली. या प्रसंगी श्री महेश कोठारे सर, श्री संदीप घुगे( अध्यक्ष, भा ज पा चित्रपट युनियन ), आमचे मित्र निर्माते संतोष आयाचित आणि सुनील भोसले, श्री. संजय कृष्णाजी पाटील आणि इतर बरेच मान्यवर उपस्थित होते.मा. सुधीरजी मुनगंटीवार साहेब, आपण ज्या आत्मीयतेने आणि खूप वेळ देऊन आमचे म्हणणे ऐकलेत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
आता प्रसादच्या या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत मराठी मनोरंजन सृष्टीचं अभिनंदन करतानाच भाजप सरकारच्या विरोधात सूर काढला आहे. कुणी लिहिलं आहे की,'लवकरात लवकर GR पास होईल असं बघा,कारण दोन अडीच वर्षांनी सरकार टीकेल असं वाटत नाही'. तर कुणी एकानं लिहिलं आहे की,'मराठी चित्रपट सृष्टीचं चांगलं होणार असेल तर चांगली गोष्ट आहे...बाकी काही अपेक्षा करू नका भाजपकडून,रोजगार तर गेलाच गेला,सिनेसृष्टी संपवली नाही म्हणजे मिळवलं...'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.