Prasad Oak: आनंद दिघे(Anand Dighe) हे नाव समस्त ठाणेकरांच्या,शिवसैनिकाच्या हृद्यात वसलेलं नाव. प्रत्यक्ष बाळासाहेबांना खूप वाटूनही रोज सर्वसामान्य शिवसैनिकाला भेटता यायचं नाही,त्यांच्यासाठी आनंद दिघे हेच त्यांचे बाळासाहेब. त्यांच्यातच तेव्हा शिवसैनिक बाळासाहेबांची छबी पहायचे. सर्वसामान्यांसाठी कार्य करणारे आनंद दीघे कायम मोठं कार्य करूनही नेहमी सर्वसामान्य बनून राहिले. कदाचित म्हणूनच ते लोकांना,शिवसैनिकांना आपला हक्काचा नेता वाटायचे. डोळ्यात जरब, चालण्यात दरारा अन् आवाजात समोरच्याला धाकात ठेवायची ताकद हे एकीकडे,तर तेच आनंद दिघे सर्वसामान्यात मिसळायचे तेव्हा उत्साही,उत्सवी मूर्ती म्हणून रंगून गेलेले देखील दिसायचे. अशा आनंद दिघेंवर जेव्हा 'धर्मवीर' सिनेमा आला त्याचं खूप जल्लोषात स्वागत केलं गेलं. सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगला पैसा कमावला. यामध्ये आनंद दिघे यांची भूमिका केलेल्या प्रसाद ओकनं तर अगदी दीघे साहेब जिवंत केले.(Prasad Oak speaks On Dharmaveer Movie And his experience of movie.)
नुकताच हा सिनेमा झी मराठीवर दाखवण्यात आला. तो देखील लोकांनी आवडीनं पाहिला. पण यानिमित्तानं झी मराठीने प्रसादची एक मुलाखत घेतली. ज्यात प्रसादने आनंद दिघेंची भूमिका साकारतानाचा त्याचा अनुभव अगदी जिवंत करत मांडला.यावेळी त्यानं सिनेमाशी संबंधित अनेक खुलासे केले.
झी मराठीनं त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात भूमिका मिळण्यापासून ते साकारण्यापर्यंतचा प्रवास प्रसादने मांडला आहे. त्याचा हाच व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. आणि यातील त्याच्या एका वाक्यानं गोंधळ उडाला,अर्थात सबंध मुलाखत ऐकल्यावर तो गोंधळ प्रसादच्या सिनेमाच्या प्रवासात रंगून जाण्यात नक्कीच परावर्तीत होईल.
प्रसाद त्या व्हिडीओत म्हणाला आहे,“दिघे साहेबांची गोष्ट खोटी वाटावी इतकी खरी आहे. ज्या उद्देषाने मंगेश देसाईंनी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी गुगलवर सर्च केलं तेव्हा दोन तीन गोष्टी समोर आल्या. एक म्हणजे सिंघानिया रुग्णालय आणि त्यानंतर एक दोन वाईट गोष्टी एवढंच येतं. ते सर्व पुसलं जावं आणि त्यांचं महान कार्य, त्यांचं काम किती मोठं आहे हे लोकांसमोर यावं. अनेक लोकांशी बोलून जेव्हा १० ते १२ लोकांकडून एक किस्सा पुन्हा पुन्हा सांगितला जायचा, तेव्हा तो किती खरा होता हे समजायचे आणि तेच दृश्य त्याने चित्रपटात दाखवले आहेत.
त्यामुळे चित्रपटात दाखवलेल्या सर्व घटना या खऱ्या आहेत. मी मोबाईल चेक करण्यासाठी उठलो तेव्हा ८ ते १० मिस्डकॉल्स होते. त्यातले ४ मिसकॉल हे मंगेश देसाई यांचे होते. त्यानंतर मी ताबडतोब त्याला फोन केला. त्याने मला काय करतोस असे विचारले तेव्हा काहीही नाही घरीच आहे, असे त्याला सांगितले. त्यानंतर त्याने मला १४ तारखेचा दुपारी २ ते २.३० पर्यंतचा वेळ मोकळा ठेव असे मला सांगितले.
ज्या माणसाला लाखो करोडो माणसं देव मानतात, दैवत मानतात अशा माणसाची भूमिका करण्याचे भाग्य माझ्या वाट्याला आलं. पण ते तितक्यात सक्षमपणे ताकदीने मला निभवता आलं पाहिजे असं टेन्शनही माझ्या डोक्यात होते. त्यावेळी मला आनंदही होता आणि प्रचंड दुखंही होते. त्यांचे फोटो व्हिडीओ पाहून मी ती भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट डोळे होते. डोळ्यांचा मेकअप मेकअप मॅन करु शकत नाही.
मी प्रत्येक वेळेला जेव्हा शॉट करायला जायचो तेव्हा दिघे साहेबांचा फोटो पाहायचो आणि तेव्हा त्यांच्यासमोर हात जोडायचो आणि एकच मागण मागायचो ते म्हणजे त्यांचा आशीर्वाद. मला तुमचा आशीर्वाद तुमच्या डोळ्यांच्या रुपाने द्या, असे मी त्यांना वारंवार सांगायचो. असे चित्रपट वारंवार निर्माण होत नाही. खूप वर्षांनी होतात. पण त्याचा परिणाम वर्षांनुवर्षे राहतो”, असे प्रसाद ओक म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.