Maharashtrachi Hasyajatra: दिवाळी भेट! महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत दामलेंचा धिंगाणा..

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाच्या मंचावर महाराष्ट्राचा नटसम्राट प्रशांत दामले आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांना लोटपोट करणार आहेत.
prashant damale in Maharashtrachi Hasyajatra diwali special episode
prashant damale in Maharashtrachi Hasyajatra diwali special episodesakal
Updated on

Maharashtrachi Hasyajatra: महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम पाहिला जातो. हास्यरसिकांना हा कार्यक्रम आठवड्यातले चार दिवस पाहायला मिळतो. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमानी रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत हा कार्यक्रम पाहिला जात असून रसिक मायबाप या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देताहेत.दिवाळी निमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या मंचावर पाहुणे म्हणून प्रशांत दामले आले आहेत. प्रशांत दामले आजपर्यंत वेगवेगळे नाटक, चित्रपट यांचा माध्यमातून आपल्या भेटीस आले आहेत. प्रशांत दामले यांचा नाटकांचे १२,५०० प्रयोग पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ते महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात आले आहेत.

prashant damale in Maharashtrachi Hasyajatra diwali special episode
Kedar Shinde: १७ वर्षांनंतर.. केदार शिंदेंनी सांगितलं अजय-अतुल सोबतचं खास नातं

एक विशेष ईच्छा व्यक्त केली ती म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील कलाकारांसोबत स्कीट करण्याची. हास्य जत्रेचे शूटिंग हा तसा किचकट भाग असतो शूटिंगच्या आदल्या दिवशी रंगीत तालमी करणं गरजेचं असतं, प्रशांत दामले त्यांच्या अत्यंत व्यस्त अशा वेळापत्रकातून वेळ काढून तालमीला हजेरी लावली. तब्बल चार ते पाच तास ते सलग सगळ्या कलावंतांबरोबर ते तालीम करत होते त्यांनी तालमीची ही प्रोसेस मजा घेत पूर्ण केली. नाटकासारखं मूळ स्क्रिप्ट बरोबर स्क्रिप्टला साजेस असं इम्प्रोवायझेशन देखील ते करत होते.

(prashant damale in Maharashtrachi Hasyajatra diwali special episode)

prashant damale in Maharashtrachi Hasyajatra diwali special episode
Parineeti Chopra: बहिणीलाही काकणभर सरस ठरली परिणीती, चुकून आली होती बॉलीवूडमध्ये..

या स्कीटमध्ये त्यांच्याबरोबर प्राजक्ता माळी, समीर चौगुले शिवाजी परब ओंकार राऊत आणि चेतना भट यांनी देखील सहभाग घेतला आहे. शूटिंगच्या दिवशी सुद्धा इतर कलावंतांसारखं, 'माझे कपडे कुठले असतील? माझा प्रवेश कधी होणार आहे? प्रवेशाच्या वेळेला कोणी काय करायचं? ए जास्त एडिशन घ्यायचे नाही, व्यवस्थित सुटसुटीत साचेबद्ध पण तडाखेबाज करूयात अशा सूचनावजा सल्ला देत प्रशांत दामले यांनी हास्य जत्रेच्या रंगमंचावरती एन्ट्री घेतली आणि हास्याचा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. अगदी पहिल्या सेकंदापासून स्कीटच्या शेवटच्या सेकंदापर्यंत त्या टाळ्या आणि अशा थांबल्याच नाहीत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या मंचावर प्रशांत दामले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रेक्षकांना दिवाळी निमित्त विशेष प्रशांत दामले यांचे स्कीट पाहायला मिळणार आहे. प्रशांत दामले यांना कॉमेडी स्कीट मध्ये पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. दिवाळी विशेष भाग सोमवार २४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पाहायला विसरू नका 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोमवार, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.