Prashant Damle: 'दामले तुमचे हे नाटक बेकार आहे बरं का?'?

सोशल मीडियावर प्रशांत दामले आणि पुरुषोत्तम बेर्डे यांची ती मुलाखत व्हायरल झाली आहे.
Prashant Damle
Prashant Damleesakal
Updated on

Prashant Damle: मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मोठं नाव म्हणून प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्याकडे पाहिले जाते. तीन दशकांहून अधिक काळ यांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. त्यांच्या नाटकांचा चाहतावर्ग मोठा आहे. दामलेंच्या अनेक नाटकांचे पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे. दामले यांच्याविषयी एक आश्चर्यकारक बाब आता समोर आली आहे. सोशल मीडियावर ती वेगानं व्हायरल झाली आहे.

एखादा कलाकार सातत्यानं तीन दशकांहून अधिक काळ नाट्यसृष्टीमध्ये स्वताची वेगळी ओळख कशी प्रस्थापित करु शकतो, सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपला चाहतावर्ग टिकवून ठेऊ शकतो, त्यांच्या प्रत्येक नाटकाची प्रेक्षकांना असणारी कमालीची कुतूहलता, एका लग्नाची गोष्ट या नाटकाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद केवळ महाराष्ट्रातच नाहीतर जगभरातील मराठी प्रेक्षकांना ज्या नाटकानं वेड लावले त्या नाटकाचे हजारो प्रयोग हे सगळं कसं शक्य झालं हे सारा प्रवास दामले यांनी त्या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडून दाखवला आहे.

Prashant Damle
Katrina-Ranbir: रणबीर कतरिनाकडे पाहतच राहिला, 'नजर झुकीच नही!'

प्रशांत दामले अंगाला काळा रंग का लावायचे? त्यांचं पहिल्या व्यवसायिक नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाचं मानधन किती होतं? असे प्रश्न नेटकऱ्यांना नेहमीच पडतात. दामले यांच्या पहिल्या नाटकाचे निर्माते आणि दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यातून त्यांनी नाटकं, त्यांचे प्रयोग, त्याला मिळालेला प्रतिसाद याविषयीच्या रंगतदार आठवणी सांगितल्या आहेत. सोशल मीडियावर ‘वन बाय थ्री’ मधून ही मुलाखती प्रेक्षकांना फेसबूकवर पाहता येणार आहे. त्या मुलाखतीवरुन नेटकऱ्यांनी दामले यांना भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांने या दोन्ही सेलिब्रेटींना त्या मुलाखतीच्या माध्यमातून बोलते केले आहे.

Prashant Damle
Adipurush Row: 'रामायणाचा खेळ...!' राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दासांना राग अनावर

दामले यांनी सांगितले की, माझ्या आजूबाजुला आरती कुणी करणारे नाही. बरेचजण टीका करणारे आहे. यावेळी दामले यांनी नागपुरमध्ये झालेल्या एका प्रयोगाचा किस्सा शेयर केला आहे. त्यात त्यांनी एका प्रेक्षकानं कशाप्रकारची प्रतिक्रिया दिली हे सांगून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दामले तुमचे हे नाटक बेकार आहे बरं का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.