Prasika Vedpathak: 'जळू नका, बरोबरी करा!' नवऱ्याचा अपमान करणाऱ्यांना झापलं

प्रसिकानं ट्विट करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. तिनं त्या ट्विटमध्ये म्हटले आहे की...
Prasika Vedpathak:
Prasika Vedpathak:esakal
Updated on

Prasika Viral tweet: सोशल मीडियावर आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलनं हजारो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या दीपिका आणि प्रसादची गोष्ट काही औरच आहे. ते नेहमीच त्यांच्या रिल्समुळे चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर प्रसिका या नावानं लोकप्रिय आहेत, गेल्या काही दिवसांपासून प्रसिका हे इन्फ्ल्युंएसर कपल वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे. प्रसादला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे व्यथित झालेल्या दीपिकानं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिली आहे.

प्रसिकानं ट्विट करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. तिनं त्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अनेकांनी माझ्या पतीला बदनाम करण्याचा आणि अपमानित केले आहे. त्याचे कारण म्हणजे त्यानं मला पैसे कमविण्यासाठी सांगितलं म्हणून. ज्यांनी कुणी आम्हाला ट्रोल केले आहे त्यासर्व कार्यकर्त्यांना मला सांगायचे आहे की, आम्ही बिझनेस पार्टनर्स आहोत. नवरा बायको होण्यापूर्वी शाळेतली मित्रही. आम्ही दोघांनी मिळून आमचं विश्व तयार केलं आहे. तेव्हा आमच्यावर जळु नका. आमच्याशी हवं तर बरोबरी करण्याचा प्रयत्न करा. असं प्रसिकानं म्हटलं आहे.

Prasika Vedpathak:
Viral: सीतेची 'झाल्या तिन्ही सांजावर' लावणी! मराठवाडा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार

प्रसिकाच्या त्या व्टिटवर अनेकांनी आपआपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. प्रसाद आणि दीपिकाविषयी सांगायचे झाल्यास ते प्रसिका या नावानं सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचा कंटेट क्रिएट करतात आणि नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. 2014 साली ते पहिल्यांदा ते युट्युबवरील युअर इंडियन कन्झ्युमर नावाच्या चॅनेलमध्ये दिसले होते. त्यानंतर त्यांनी इंस्टावर प्रसिका या नावानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.

Prasika Vedpathak:
Viral Video: काळजाचा चुकेल ठोका, चालत्या ट्रेनमधून दिलं ढकलून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.