Pratyusha Banerjee Suicide Case Update : 'बालिका वधू' मालिकेत 'आनंदी' ची भुमिका साकारुन घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिल 2016 साली आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला. तिच्या या निर्णयानं चाहत्यांना धक्का बसला होता. तर अख्खी इंडस्ट्रीच हादरली होती.
प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिचा लिव्ह इन पार्टनर आणि बॉयफ्रेंड राहुल राज सिंग वर अभिनेत्रीच्या आई-वडिलांनी आरोप केला होता आणि त्याच्या विरोधात त्यांनी तक्रारही नोंदवली होती. ज्यानंतर काही दिवसांसाठी राहुल राजला जेलमध्ये देखील जावं लागलं होतं.
बॉयफ्रेंड राहुलने तिचा विश्वासघात केला होता त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये होती आणि नाराज होऊन प्रत्युषाने आत्महत्येसारखं पाऊल उचललं होते. प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येचे प्रकरणाचा खटला अजूनही न्यायालयात सुरू आहे.
याबाबत मुंबई न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीत आत्महत्येप्रकरणी मुंबईतील न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. प्रत्युषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या राहुल सिंगची निर्दोष मुक्तता करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. राहुलने सिंगने तिचा छळ केला आणि प्रत्युषाला आत्महत्येचा विचार करण्यास भाग पाडल्याचं कोर्टानं सांगितलं.
या प्रकरणात कोर्टानं सांगितलं की, राहुलने केलेल्या शारीरिक, भावनिक आणि आर्थिक छळामुळे आणि शोषणामुळे प्रत्युषा बॅनर्जी नैराश्याच्या गेली होती. राहुलने प्रत्युषाचं दुःख कमी करण्यासाठी काहीच केले नाही. कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही, जे स्पष्टपणे तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या वर्गात येतं.
यावेळी राहुलने दावा केला होता या प्रकरणामुळे त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरु आहे आणि त्याला खोट्या प्रकरणात अटकवण्यात आले आहे. तो आणि प्रत्युषाचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि डिसेंबर २०१६ मध्ये त्यांचे लग्न होणार होते. असंही तो म्हणाला मात्र आता यावर कोर्टानं दिलेल्या निर्णयामुळे पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.
याबाबत न्यायमूर्ती समीर अन्सारी यांनी राहुल सिंहची ही याचिका फेटाळताना काही महत्वाची निरीक्षणे नोंदवली. न्यायालयाने या प्रकरणात प्रत्युषा बॅनर्जीच्या कथित प्रियकराला क्लीन चिट देण्यास नकार दिला आहे.
राहुलच्या विरुद्ध कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे), 504 (हेतूपूर्वक अपमान), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि 323 (स्वैच्छिक दुखापत करणे) ची नोंद करण्यात आली. राहुलवर आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.