Praveen Kumar Sobti: आठवणी आल्या दाटून, नितीश भारद्वाज यांची भावुक पोस्ट

Praveen Kumar Sobati
Praveen Kumar SobatiMahabharat
Updated on

बी.आर. चोप्रा यांच्या पौराणिक शो 'महाभारत' (Mahabharat) मध्ये भीमची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti) यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता दीर्घकाळ आजार आणि आर्थिक संकटाशी झुंज देत होता. प्रवीण कुमार सोबती यांनी केवळ अभिनयाच्याच नव्हे तर क्रीडा विश्वातही खूप नाव कमावले होते.

प्रवीण कुमार सोबती त्यांच्या उंचीमुळे लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होते. अभिनेता असण्यासोबतच ते अॅथलीटही (Athlete) होते. त्याने हातोडा आणि डिस्क थ्रोमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. बीएसएफमध्ये माजी डेप्युटी कमांडंट असलेल्या प्रवीणने आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. हाँगकाँग येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. 1960 आणि 70 च्या दशकात त्यांनी अॅथलेटिक्समध्येही प्रचंड लोकप्रियता मिळवली.

महाभारत
महाभारतTV Entertainment

अनेक अभिनेत्यांनी आपला शोक व्यक्त केला. त्याच सोबत टी.व्ही शो (TV Show) 'महाभारत' मध्ये श्री कृष्णाची भुमिका करणारे प्रख्यात अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) यांनी देखील दु:ख व्यक्त करत लिहिले, '' यापुढे आशियाई खेळांचे चॅम्पियन आणि महाभारतातील भीमच्या कामगिरीसाठी प्रसिद्ध असणारे प्रवीण कुमार सोबती आज आपल्याला सोडून गेले. या क्षणी अनेक आठवणी मनात दाटून येतात. पण ते नेहमी एक अस्सल खेळाडू होते, जे कधीही क्षुल्लक राजकारण, पाठीमागून कोणावरही टीका करणे या गोष्टींमध्ये पडले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनात हसणे आणि आपल्या पंजाबी विनोदातून सर्वांना हसवणे आणि इतरांपर्यंत आनंद पोचवणे या तत्वांवर ते जगले. ते पंजाबचे एक गोड व्यक्तीमत्त्व होते. त्याच्या आत्म्याला सद्गती आणि पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळो. त्यांच्या आत्म्यासाठी मी प्रार्थना करतो.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()