Ashadhi Ekadashi 2023: आणि आई - बाबांची इच्छा प्रवीण तरडेंनी पूर्ण केली, पन्नास वर्ष वारीची परंपरा

दिग्दर्शक प्रवीण तरडे पंढरपुरात आई - बाबांना पांडुरंगाच्या दर्शनासाठी घेऊन गेले आहेत.
 pravin tarde, Ashadhi Ekadashi 2023, Ashadhi Ekadashi 2023 news, pandharpur
pravin tarde, Ashadhi Ekadashi 2023, Ashadhi Ekadashi 2023 news, pandharpurSAKAL
Updated on

आज आषाढी एकादशी. पांडुरंगाला भेटण्यासाठी लाखो वारकरी आज पंढरपुरात असतील. सावळे सुंदर रूप मनोहर पाहून वारकऱ्यांना जन्माच समाधान लाभलं असेल. विविध गावं पालथी घालत, रिंगण करत, मुखी ग्यानबा तुकारामाचा जप करत महाराष्ट्रातील तमाम वारकरी आज पंढरपुरात आनंदाचा सोहळा जगत असतील. अशातच मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते - दिग्दर्शक प्रवीण तरडे पंढरपुरात आई - बाबांना पांडुरंगाच्या दर्शनासाठी घेऊन गेले आहेत.

 pravin tarde, Ashadhi Ekadashi 2023, Ashadhi Ekadashi 2023 news, pandharpur
या खेळात जिनीलिया भारताकडून खेळलीय Genelia Deshmukh

प्रवीण तरडे यांनी पंढरपुरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरातला फोटो पोस्ट केलाय. हे फोटो पोस्ट करून प्रवीण तरडे लिहितात... काही महिन्यांपूर्वी आईवडीलांना म्हणालो बोला तुम्हाला कुठे फिरायला जायचंय.. ? तुम्ही म्हणाल तिथं घेउन जातो , म्हणाल त्या देशात.. ते म्हणाले पंढरपूरला घेऊन चल .. मी म्हणालो पंढरपूर ..? का ..? तर ते म्हणाले की पन्नास वर्ष चालत वारी करतोय पांडुरंगाला कधी जवळून नाही पाहीलं, धक्केबुक्के खात ढकलाढकलीतच दिसलाय तो थोडा थोडा.. जरा निरखून पहायचाय..

प्रवीण तरडे पुढे सांगतात.. मग एका एकादशीला शुटींग बिटींग सगळं थांबवून दोघांना घेउन गेलो पंढरपूरला.. विठ्ठलाकडे एकटक बघत बराच वेळ रडतच होते दोघं .. त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात दिसलं की वारीची ही परंपरा ईतकी वर्ष का टिकून आहे .. पन्नास वर्ष चालत जातायेत तरी ट्रीपला कुठं जायचंय म्हटल्यावर त्यांना पंढरपूरच आठवलं.. वारी चाललेल्या प्रत्येक माऊलीला आषाढीच्या खुप खुप शुभेच्छा अशा भावना प्रवीण तरडे यांनी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.