Pratyusha Suicide Death Case : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आपल्या अभिनयानं चाहत्यांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या प्रत्युषाचे जाणे चाहत्यांच्या मनाला चटका लावून जाणारे होते.
प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येच्या प्रकरणावर सुनावणी करताना सेशन कोर्टाकडून महत्वाचा निर्णय देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल सिंहनं त्याच्या निर्दोष मुक्ततेसाठी याचिका दाखल केली होती. ती आता कोर्टानं फेटाळली आहे. प्रत्युषाला आत्महत्या करण्यात तिच्या बॉयफ्रेंडचा हात होता असे निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. यासगळ्यात प्रत्युषाच्या वडिलांनी आजतक वेबसाईटशी बातचीत केली आहे.
Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत
यावेळी प्रत्युषाच्या वडिलांनी तीव्र शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. २०१६ मध्ये प्रत्युषाच्या आत्महत्या प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहवर गंभीर आरोप करण्यात आले होते. राहुलनं कोर्टात त्याच्या निर्दोष मुक्ततेसाठी अर्जही केला होता. आता तो न्यायालयानं फेटाळल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रत्युषानं आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलले याला जबाबदार राहुल आहे.
प्रत्युषाच्या वडिलांनी शंकर बॅनर्जी यांनी आजतक ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, आपल्या व्यवस्थेविषयी न बोललेच बरे, केस सुरु होण्यासाठीच आठ वर्षे निघून गेली. आम्ही पहिल्यापासून हेच सांगत आहोत की, ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे ही आत्महत्या नव्हे तर हत्या असल्याचे सांगते. आता एक एक गोष्टी समोर येत आहेत.
आम्हाला खात्री आहे की, सत्य लवकरच समोर येईल. त्या आठ वर्षात आम्ही काय काय झेललं आहे आमचे आम्हाला माहिती आहे. आता काही करुन प्रत्युषाला न्याय मिळवून देणे हेच आमच्या आयुष्याचे ध्येय झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.