Preity Zinta Video: 'एका अयशस्वी पुरुषामागे...', महिलांविषयी हे काय बोलून गेली प्रीती झिंटा?

सध्या इन्स्टावर प्रीती झिंटाचा एक इन्स्पिरेशनल व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यातील तिचे विचार अनेकांना पटले, तर अनेकांना खटकले आहेत.
Preity Zinta
Preity ZintaInstagram
Updated on

Preity Zinta Video: प्रीती झिंटा आता बॉलीवूडमध्ये फारशी सक्रिय नसली तरी अधनं-मधनं सोशल मीडियावर ती आपल्या जुळ्या मुलांचे फोटो शेअर करताना दिसते तर कधी इतरही तिच्या खास पोस्ट चाहत्यांसाठी आकर्षणाचा भाग ठरतात.

सध्या इन्स्टावर तिचा एक इन्स्पिरेशनल व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यातील तिचे विचार अनेकांना पटले आहे तर अनेकांना खटकले आहेत. चला जाणून घेऊया नेमकं व्हिडीओत काय म्हणताना दिसत आहे प्रीती झिंटा?

Preity Zinta
The Lost Prime Minister:सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य समोर आणते ही सीरिज.. सत्य घटना हैराण करतील..
Preity Zinta
Athiya-Rahul नं वेडिंग आऊटफिट्ससाठी 'या' दोन खास रंगांना दिलीय पसंती..डिझायनरचं नावही आलं समोर

प्रीती झिंटाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ती एका कार्यक्रमात संवाद साधताना दिसत आहे. ज्यात ती म्हणतेय की, ''एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तर एका अयशस्वी पुरुषामागे दोन स्त्रिया असतात...'',ती हे वाक्य म्हणते नं म्हणते तोच उपस्थित पुरुषवर्गातनं जोरात हशा पिकलेला ऐकू येत आहे...

प्रीती पुढे म्हणते, ''एका यशस्वी स्त्रीमागे मात्र एक प्रगतीशील पुरुष असतो...मग ते तिचे वडील,भाऊ किंवा नवरा यापैकी कुणीही असू शकतं''.

प्रीती झिंटाच्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियांचा वर्षाव झालेला आहे. काहींना प्रीतीचं हे बोलणं खटकलं आहे तर काहींनी तिची प्रशंसा केलीय. एकानं लिहिलंय,'ही नेहमी काहीही बोलते..,', आणखी एकानं लिहिलं आहे,'ही जे बोलतेय ते मुळीच बरोबर नाही,माझा संताप होतोय...', तर प्रीतीनं प्रगतीशील पुरुषांविषयी म्हटलेल्या वाक्यानं पुरुषवर्गातील अनेक जण तिच्यावर खूश झालेयत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()