preity zinta: मणिरत्नम दिग्दर्शित 'दिल से...' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता पण 'सोल्जर' या चित्रपटाने प्रीतीला खरी ओळख दिली. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात प्रिती आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. आज 24 वर्षांनंतर प्रितीने एक व्हिडिओ शेयर करत या चित्रपटाची आठवण सांगितली आहे.
(Preity Zinta shared Soldier song video and says she took long break to take psychology exams during Soldier shoot)
आज प्रिती झिंटाने एका पोस्टच्या माध्यमातून या चित्रपटातील सगळ्यांचे आभार मानले आहेत आणि 'सोल्जर' चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानची एक गोष्ट शेअर केली आहे. प्रिती झिंटाने तिच्या इंस्टाग्रामवर 'सोल्जर'चे टायटल साँग शेअर केले आहे.
सोबत कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, 'सोल्जर हा माझा दुसरा चित्रपट होता पण मी साइन केलेला पहिला चित्रपट होता. त्यावेळी एकाच नावाच्या दोन दिग्दर्शकांसोबत काम करत असल्याने मी प्रचंड गोंधळात होते. पण अब्बास भाई आणि मस्तान भाई मी तुमची आभारी आहे. की त्यांनी मला कधीही ढळू दिलं नाही. राजस्थानमध्ये क्लायमॅक्सच्या शूटिंगदरम्यान मी मानसशास्त्राची परीक्षा देण्यासाठी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ सुट्टी घेतली होती त्यावेळी रमेशजी तुम्ही मला खुप समजुन घेतले यासाठी मी तुमचीपण आभारी आहे.
पुढे ती म्हणते, 'बॉबी तु माझ्यासोबत चित्रपटात होतास आणि तुझ्यामुळे मी चित्रपटामध्ये आले त्यासाठी धन्यवाद. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या शूटिंग साठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि राजस्थानमध्ये या ठिकाणी सर्वांनी जी काही मेहनत घेतली त्यासाठी संपूर्ण कलाकार आणि क्रू मेंबर्सचे मी आभार मानते. कोरिओग्राफर सरोज खान आज आपल्यात नसल्या तरी त्यांची आठवण मला आवर्जून काढावीशी वाटते. एक हिरोईन कशी असावी हे त्यांनी मला शिकवलं..'
प्रिती झिंटाची ही पोस्ट सध्या बरीच व्हायरल होत आहे. सध्या ती आपल्या पती जीन गुडइनफ सोबत लॉस एंजेलिसमध्ये आहे. प्रितीला जिया आणि जय अशी दोन जुळी मुलं आहेत. प्रिती शेवटची 2018 साली प्रदर्शित झालेल्या "भैय्याजी सुपरहिट" या चित्रपटात दिसली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.