ब्रिटिश राजघराण्यातून बाहेर पडलेले प्रिन्स हॅरी Prince Harry आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल Meghan Markle यांना कन्यारत्न प्राप्त झालं. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी त्यांच्या चिमुकल्या मुलीचे नाव लिलिबेट डायना माऊंटबॅटन-विंडसर असं ठेवलं आहे. प्रिन्स हॅरी यांची दिवंगत आई डायना यांच्या नावावरून मुलीचं नाव 'लिलिबेट डायना' असं ठेवण्यात आलं आहे. मेगनने ४ जून रोजी कॅलिफोर्नियातील सँटा बार्बरा कॉटेज हॉस्पिटलमध्ये लिलीला जन्म दिला. '४ जून रोजी आमच्या घरात लिलीचं आगमन झालं. आम्ही ज्याचं स्वप्न पाहिलं होतं, त्याहून अधिक आम्हाला मिळालं असून आमच्यासाठी जगभरातून प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मन:पूर्वक आभार', अशा शब्दांत दोघांनी आनंद व्यक्त केला. (Prince Harry and Meghan Markle welcome their second baby )
लिलिबेट हे राणी एलिझाबेथ यांच्या बालपणीचं टोपणनाव होतं. प्रिन्स हॅरी आणि मेगन सध्या ब्रिटिश राजमहालाचा त्याग करून अमेरिकेत सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगत आहेत. काही महिन्यांपूर्वीच हे दोघं त्यांच्या मुलाखतीमुळे चर्चेत आले होते. राजमहालात वांशिक शेरेबाजी झाल्याचा आरोप मेगनने या मुलाखतीत केला होता. या मुलाखतीची चर्चा जगभरात झाली होती.
प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा विवाह १९ मे २०१८ रोजी पार पडला. २०१९ मध्ये मेगनने मुलाला जन्म दिला. जानेवारी २०२० मध्ये या दोघांनी राजघराण्याचा त्याग करून अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.