Priya Berde: अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश, राष्ट्रवादीला रामराम

देवेंद्र फडणवीसांनी यांनी सर्वांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांचं पक्षात स्वागत केलं
priya berde, priya berde in bjp, devendra fadanvis
priya berde, priya berde in bjp, devendra fadanvisSAKAL
Updated on

Priya Berde News: सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितित प्रिया बेर्डे यांनी भाजप मध्ये प्रवेश केलाय. प्रिया बेर्डेयांनी ७ जुलै २०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता.

आता प्रिया बेर्डे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय. देवेंद्र फडणवीसांनी यांनी सर्वांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांचं पक्षात स्वागत केलं

(Priya Berde joined BJP)

priya berde, priya berde in bjp, devendra fadanvis
Priyadarshini Indalkar: पुण्याची विनम्र आणि सुंदर अभिनेत्री प्रियदर्शनी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज शनिवार ११ फेब्रुवारी २०२३ ला पक्षीय कार्यकारणी बैठक झाली. यावेळी अनेक नवीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी प्रिया बेर्डे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजप मधला प्रवेश स्वीकारला.

दरम्यान प्रिया बेर्डेंनी ७ जुलै २०२० ला राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रावादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेला. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र म्हणत प्रिया बेर्डे यांनी भाजप मध्ये प्रवेश केलाय

priya berde, priya berde in bjp, devendra fadanvis
Aamir Khan: म्हातारा झालास कि काय? लग्नात आमिर खानला काठीचा आधार, फॅन्सना काळजी..

प्रिया बेर्डे या मराठीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. गेली अनेक वर्ष प्रिया बेर्डे मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रिया बेर्डे या पत्नी आहेत. प्रिया आणि लक्ष्मीकांत यांची मुलं स्वानंदी आणि अभिनय हे दोघे सुद्दा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रिया बेर्डे सध्या लेक स्वानंदी सोबत धनंजय माने इथेच राहतात या नाटकात अभिनय करत आहेत

काही महिन्यांपूर्वी प्रिया बेर्डे यांना १० लाख रुपये भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पुण्यात २०१२ साली अखिल भारतीय चित्रपट मंडळाकडून ‘मानाचा मुजरा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी ५२ लाख रुपये खर्च करण्यात आले होते.

‘मानाचा मुजरा’ कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या खर्चावर कोल्हापूर येथील काही सभासदांनी आक्षेप घेतला होता. पुढे धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे प्रिया बेर्डे सह अलका कुबल, विजय पाटकर याना १० लाख रुपये एका आठवड्यात भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.