Priyanka Chopra: प्रियंकावर भडकलेयत नेटकरी, म्हणाले,'ढोंगी कुठली, हिला भारत सोडून...'

अभिनेत्री प्रियंका चोप्राला एका वादग्रस्त प्रकरणावर पोस्ट करणं महाग पडलं आहे.
Priyanka Chopra:  Priyanka chopra attacked mecilessly for supporting iranian women over hijab protest
Priyanka Chopra: Priyanka chopra attacked mecilessly for supporting iranian women over hijab protest Instagram
Updated on

Priyanka Chopra: प्रियंका चोप्रानं जेव्हापासून ईराणमधील हिजाब वाद आणि त्यावरनं सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला तेव्हापासून तिच्यावरोधात नको-नको ते बोललं जात आहे. सोशल मीडियावर प्रियंका चोप्राला 'ढोंगी' म्हणत हिणवलं जात आहे. लोक म्हणतायत, हिला भारत सोडून अख्ख्या जगाची चिंता आहे. प्रियंकानं काही दिवसांपूर्वीच इराणमधील महिलांची तसंच हिजाब विरोधात पुकारलेल्या आंदोलनामागच्या त्यांच्या धाडसाची जोरदार प्रशंसा केली होती. तिनं यासंदर्भात आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्टही शेअर केली होती. पण आता ही पोस्ट करणं प्रियंकाला महाग पडलंय.(Priyanka Chopra: प्रियंकावर Priyanka chopra attacked mecilessly for supporting iranian women over hijab protest)

Priyanka Chopra:  Priyanka chopra attacked mecilessly for supporting iranian women over hijab protest
Happy birthday Rekha: सोपा नव्हता रेखाचा प्रवास! अभिनेत्री होण्याआधी सोसले हाल, वडिलांचा करायच्या तिरस्कार

सोशल मीडियावर नेटकरी प्रियंका चोप्रावर खूपच आगपखड करताना दिसत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की प्रियंका चोप्रा भारतीयांना सोडून प्रत्येक देशातील लोकांना पाठिंबा देण्यासाठी सज्ज असते. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की प्रियंकाला या गोष्टीचं काही घेणंदेणं नाही की आपल्या भारत देशात काय चाललंय. एका नेटकऱ्यानं बिलकिस बानोचं उदाहरण देत लिहिलं आहे की, 'प्रियंकानं इराणच्या महिलांप्रती जे समर्थन दिलं आहे,ते चांगलच आहे पण बिलकिस बानोसोबत जे घडलं तसंच आपल्या भारत देशातील इतर महिलांसोबत जे घडतंय त्यावर मौन बाळगणं तिला शोभतं का. त्यावर तिनं कधीच आवाज उठवला नाही. यावर खरंच विचार व्हायला हवा'. नेटकऱ्यांची तक्रार आहे की प्रियंका नेहमी इतर देशातील समस्यांवर आवाज उठवते पण आपल्या भारतातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलताना मात्र तिला त्रास होतो.

Priyanka Chopra:  Priyanka chopra attacked mecilessly for supporting iranian women over hijab protest
Priyanka Chopra: Priyanka chopra attacked mecilessly for supporting iranian women over hijab protestTwitter

गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीत बिलकिस बानोवर गॅंगरेप झाला होता आणि त्यावेळी तिच्या नजरेसमोर कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केली गेली. या हत्येप्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या ११ आरोपींना काही दिवसांपूर्वीच सोडण्यात आलं. तेव्हा मात्र प्रियंका चोप्रा त्यावर काहीच बोलली नाही. आणि नेमकं नेटकऱ्यांना हेच खटकलं आणि त्यांनी प्रियंकावर राग काढला. असं याआधी देखील अनेकदा घडलंय जेव्हा प्रियंका चोप्राने इतर देशातील मुद्द्यांवर आवाज उठवला होता. आणि म्हणूनच नेटकऱ्यांनी याचा राग प्रियंकावर आता काढला आहे.

इराणमध्ये गेल्या काही काळापासून हिजाबला विरोध केला जात आहे. मोठा वाद यावरनं सुरु आहे. काही दिवसांपूर्वी महसा अमिनी या मुलीच्या मृत्यूनंतर इराणमधील महिलांनी तेथील सरकार आणि पोलिसांच्या विरोधात आंदोलनाचा तीव्र पवित्रा घेतला. महसा अमिनीला इराणच्या पोलिसांनी फक्त हिजाब नीट परिधान केला नाही या कारणानं अटक केली होती पण त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात असताना तिला मारहाण करण्यात आली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला होता. याच कारणानं इराणच्या महिलांनी पुकारलेल्या आंदोलनाला प्रियंका चोप्रानं पाठिंबा दिला आहे. नेटकरी जिथे प्रियंकाला खूप भलं-बुरं सुनवत आहेत तिथे आता फिल्ममेकर अशोक पंडीत मात्र प्रियंकाचं समर्थन करताना दिसले.

Priyanka Chopra:  Priyanka chopra attacked mecilessly for supporting iranian women over hijab protest
Priyanka Chopra: Priyanka chopra attacked mecilessly for supporting iranian women over hijab protestInstagram

अशोक पंडीत यांनी आपल्या ट्वीटर हॅंडलवर प्रियंका चोप्राची प्रशंसा करत लिहिलं आहे की, 'प्रियंकानं ज्या पद्धतीनं इराणच्या महिलांच्या हिजाब विराधात सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे ते खरंच प्रशंसनीय आहे. मी आशा बाळगतो की फिल्म आणि टी.व्ही इंडस्ट्रीतील लोक यातून काहीतरी शिकतील. आणि पुढे येऊन आवाज उठवतील'. पण आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिलंय ते म्हणजे प्रियंका ट्रोलर्सना काय उत्तर देते ते याकडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.