प्रियंका चोप्रानं(Priyanka Chopra) अमेरिकन सिंगर निक जोनसशी(Nick Jonas) लग्न केल्यावर अमेरिकेला जी निघून गेली ती फार आलीच नाही भारतात. तिनं बॉलीवूडपासूनही तसं अंतर बनवलंच आहे की,आणि रमलीय बरी आपल्या हॉलीवूड(Hollywood) नगरीत. असो,ती प्रतिभावान आहे यात शंकाच नाही. त्यात तिनं आंतरराष्ट्रीय पातळीवर जे मोलाचं काम करुन ठेवलंय ते मोठंच आहे. पण म्हणून काय भारताकडे,बॉलीवूडकडे अशी पाठ फिरवणं योग्य नाही असं तिचे चाहते नाराज होऊन बोलतात अनेकदा. मग त्यांच्याच खातर अधन-मधनं करते ती एखादा सिनेमा. आता फरहान अख्तरच्या सिनेमात ती लवकरच दिसणार आहे आपल्याला,नो डाऊट.
प्रियंका सोशल मीडियावरनं तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी नेहमी अपडेट देतच असते. काहीच दिवसांपूर्वी तिनं सरोगसीच्या माध्यमातून आपण आई झालो आहोत अशी पोस्ट केली अन् तिच्यावर कौतूकाचा वर्षाव झाला होता. आता सध्या ती तिचं मातृत्व एन्जॉय करतेय. प्रियंकाची सध्या एक पोस्ट मात्र चर्चेत आलीय,ते तिला मुंबईची आठवण आल्याचं तिनं म्हटल्यानं. तिला 'ती' गोष्ट म्हणे निकपेक्षाही प्रिय आहे. कोणती गोष्ट आहे बरं ती?
प्रियंकानं तिच्या इन्स्टा स्टोरीत एक फोटो पोस्ट केला आहे. जो फोटो आहे भारतीय पारंपरिक पदार्थाचा. अर्थात प्रियंका तो नाश्ता अमेरिकेत करत आहे बरं का. आणि ते खाताना तिला तिच्या मुंबईतील,आपल्या मुंबईची आठवण आली आहे. तसं तिनं तो फोटो पोस्ट करुन लिहिलंय. तो भारतीय पारंपरिक पदार्थाचा नाश्ता तिनं अमेरिकन रेस्टॉरंटमधून मागवला आहे. प्रियंकानं फोटो पोस्ट करत लिहिलंय,“Poha in LA that took me back to Mumbai,” along with fold and heart icons.'' म्हणजे प्रियंकाला कांदोपोहे खूप आवडतात. जे अमेरिकेत खाताना तिला मुंबईची आठवण होतेय. प्रियंकाला जेवणात लोणचं आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या आमटीचे,ग्रेव्हीचे प्रकार खूप आवडतात. तिनं न्यूयॉर्कमध्ये स्वतःचं सोना हे रेस्टॉरंटही गेल्यावर्षी काढलं आहे. पण अस्सल चाव चाखायची तर मुंबईत यावंच लागेल नं तिला. लवकरच ती येणार असल्याचे संकेत तिची आई मधु चोप्रांनी दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.