रशियाने(Russia) युक्रेनवर(Ukraine) हल्ला केल्यानंतर तेथील अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळत आहेत. तिथली परिस्थिती एकंदरीत भीतीदायक आहे. रशियानं युक्रेनवर केलेल्या या हल्ल्याचा निषेध करीत अभिनेत्री प्रियंका चोप्रानं(Priyanka Chopra) मदतीचं आवाहन केलं आहे. रशियानं युक्रेनवर केलेलं आक्रमण खूपच भयभीत करणारं आहे,तेव्हा युक्रेनला आता सहकार्याची गरज आहे. युक्रेन सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. या युद्धात मात्र हकनाक बळी जातोय तो सर्वसामान्य लोकांचा. यात भरडले जातायत ते सर्वसामान्य युरोपियन्स. तिनं 'Unicef' या संस्थेच्या माध्यमातून या युद्धजन्य परिस्थितीत सापडलेल्या सर्वसामान्य लोकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
तिनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मदतीच्या आवाहनाची पोस्ट शेअर करतानाच एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. हा युक्रेन-रशियात युरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा आढावा देणाऱ्या बातमीचा व्हिडीओ आहे. कसं लोकं अंडरग्राऊंड सब वे स्टेशन्समध्ये आपला जीव वाचवण्यासाठी दडून बसलेयत. हे देखील चित्रण या व्हिडीओच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय.
प्रियंकानं लिहिलंय,''युक्रेनमध्ये सध्या खूप भीतीचं वातावरण पसरलं आहे. लोकं सध्या स्वतःचा आणि आपल्या प्रियजनांचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करीत आहेत. आजच्या कलयुगात या आपत्तीजनक गोष्टी घडू कशा शकतात हे समजण्यापलिकडचं आहे. या युद्धामुळे एक गोष्ट मात्र लक्षात आली की भविष्यात कुठल्याच गोष्टीची आपण शाश्वती देऊ शकत नाही. सगळंच अनिश्चित बनत चाललं आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की,या युद्धाचे परिणाम जगभरात उमटणार आहेत. आणि सगळ्यांनाच या सामना करावा लागणार आहे. तसंच,ही अशी परिस्थिती कुणावरही येऊ शकते, या युद्धाची पुनरावृत्ती कुठेही होऊ शकते''.
तिनं लोकांना युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या सर्वसामान्य लोकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. ''तिथे युद्धात फसलेली ती लोकं तुमच्या-आमच्यासारखीच आहेत. मी त्यांना कसं मदत करता येईल ते थोडक्यात माझ्या पोस्टमध्ये सांगितलं आहे''. प्रियंका Unicfची २०१६ मधील ब्रॅंड अॅम्बेसिडर होती. अभिनेता सोनू सूदने देखील युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप सोडवून आणण्याची विनंती भारतीय सरकारला केली आहे. एखाद्या सुरक्षित मार्गानं भारतीयांना परत कसं आणता येईल ते लवकरात लवकर पहा अशी विनंतीही सोनूनं केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.