Priyanka Chopra: पहिल्यांदाच भारतात आलेली प्रियांका चोप्राची मुलगी मालतीला कसा वाटला देश? अभिनेत्री म्हणाली...

प्रियांका चोप्रा 'सिटाडेल'च्या प्रमोशनसाठी भारतात आली होती. यासोबतच अभिनेत्रीने तिची मुलगी मालती मेरी जोनासच्या पहिल्या भारत दौऱ्याबद्दलही अनेक गोष्टी शेअर केल्या.
priyanka chopra
priyanka chopraSakal
Updated on

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास सध्या तिच्या 'सिटाडेल' या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रियांका चोप्रा सध्या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी वर्ल्ड टूरवर गेली आहे. अभिनेत्रीने या दौऱ्याला भारतापासून सुरुवात केली आहे.

या ट्रिपमध्ये प्रियंका चोप्रासोबत पहिल्यांदाच तिची मुलगी मालती मेरी जोनासही भारतात आली होती. यानंतर प्रियंका चोप्राने आपल्या मुलीच्या पहिल्या भारत दौऱ्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी शेअर केल्या आहेत.

एका मुलाखतीत जेव्हा प्रियांका चोप्राला तिची मुलगी पहिल्यांदा भारतात आली याबद्दल विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्रीने उत्तर दिले, 'माझी मुलगी पहिल्यांदा भारतात आली आहे. तीही पहिल्यांदाच मुंबईत पोहोचली. तिला ते आवडते, इथल्या ठिकाणांपासून ते आवाज आणि इथल्या जेवणापर्यंत सर्व काही आवडते. यासोबतच ती पहिल्यांदा तिच्या आजीच्या घरी म्हणजे माझ्या आईकडे गेली, जिथे तिला सर्व काही खूप आवडले.'

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लॉन्चिंगला प्रियंका चोप्रा आणि तिची मुलगी मालती मेरी जोन्सही पोहोचली. यासोबतच ती मालतीसोबत इतरही अनेक ठिकाणी गेली.

priyanka chopra
Arshad Warsi Birthday: सेल्समन, कोरिओग्राफर ते अभिनेता; अशा प्रकारे 'सर्किट'ने बॉलिवूडमध्ये कमावलं मोठं नाव

डेव्हिड वेल दिग्दर्शित या स्पाय थ्रिलर-अॅक्शन वेबसिरीजमध्ये प्रियांका चोप्रा गुप्तहेर 'नादिया सिंग'च्या भूमिकेत दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये प्रियांका चोप्रासोबत रिचर्ड मॅडन, स्टॅनली टॉक्सी आणि अॅशले कमिंग्स सारख्या बड्या स्टार्सनी आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. OTT वर प्रेक्षकांसाठी ही सिरीज 28 एप्रिल रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()