Viral Video: प्रियंका चोप्रा गुरुवारी ६ एप्रिल,२०२३ रोजी आपली मुलगी मालती सोबत सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली,जिथं तिनं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. प्रियंकाचा मुलीसोबत मंदिरात दर्शन घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे,ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
प्रियंका काही दिवसांपूर्वीच आपला पती निक जोनस आणि मालती मेरी जोनससोबत भारतात आली आहे. मालती मेरी पहिल्यांदाच भारतात येत आहे,त्यामुळे अर्थातच ती सर्वांसाठी कुतूहलाचा विषय बनली आहे.(Priyanka Chopra With Daughter at siddhivinayak Temple,Mumbai)
भारतात आल्यानंतर प्रियंका आपला पती निकसोबत दिसली ते अंबानींच्या NMACC च्या उद्घाटन सोहळ्यात. त्यांनतर लगेचच तिच्या आगामी 'सिटाडेल' सीरिजचं स्क्रीनिंग ठेवलं गेलं होतं, आता ६ एप्रिलला प्रियंका मुलीसोबत पोहोचलेली दिसली ते मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात.
व्हायरल व्हिडीओत सगळ्यांच्या नजरेस पडलं आहे की मंदिरातील पंडीत मंत्रोच्चारण करत प्रियंका आणि तिची मुलगी मालती मेरी चोप्रा-जोनस हिला देवाचं गंध लावत आहेत आणि तिच्या माथ्यावर हात ठेवत तिला आशीर्वाद देत आहेत.
हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी प्रियंकाच्या मुलीवर प्रेमाचा वर्षाव केला. पण काही नेटकऱ्यांनी मात्र प्रियंकाला मंदिरात मिळालेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटवर आक्षेप घेतला आहे.
नेटकऱ्यांनी प्रश्न केला की सिद्धिविनायक मंदिरात साधं फोटो काढायला सुद्धा मनाई आहे मग व्हिडीओ तर दूरची गोष्ट. तर मग प्रियंकासाठी नियम धाब्यावर बसवले का? व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी काय कमेंट केल्यात,चला पाहूया.
प्रियंका आणि निक जोनस हे सरोगसीच्या माध्यमातून आपली मुलगी मालती मेरी हिचे जानेवारी २०२२ साली पालक बनले. सुरुवातीला प्रियंकानं आपल्या मुलीचा चेहरा पब्लिकसमोर आणला नाही मात्र आता अनेक ठिकाणी ती मुलीसोबत पोझ देताना दिसते.
प्रियंका सध्या फक्त आपल्या आगामी 'सिटाडेट' सीरिजमुळेच चर्चेत नाही तर तिच्या बॉलीवूड विरोधात बोललेल्या मुलाखतीमुळे देखील चर्चेत आहे. या मुलाखतीत बॉलीवूड सोडल्यामागचं कारण सांगत प्रियंकानं खळबळ उडवून दिली होती. आपल्याविरोधात राजकारण खेळलं गेलं आणि आपल्याला साइडला केलं गेलं असं विधान प्रियंकानं मुलाखतीत केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.