प्रियांकाचा 'तो' हॉट ड्रेस, 20 वर्षांपूर्वीची 'या' अभिनेत्रीची फॅशन

Priyanka Chopras Dress is copy of Jennifer Lopezs Iconic From 20 Years Ago
Priyanka Chopras Dress is copy of Jennifer Lopezs Iconic From 20 Years Ago
Updated on

मुंबई : प्रियांकाने काही तासांपूर्वीच आपल्या इन्स्टांग्रामवर अकाउंटवरती या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'This guy#Grammys2020' हे तिचे फोटो सोशल मिडीयात सध्या खुप चर्चेत आहेत. तिचे फॅन्सची मोठी पसंती या फोटोंना मिळत आहे. ग्रॅमीच्या रेड कार्पेटवरती प्रियांकाने आपला जलवा दाखविला आहे. याचीच सध्या जोरदार चर्चा आहे. पण, दुसऱ्या बाजूला इंटरनेट आर्मिने प्रियांकाला ट्रोल केलं आहे तिच्या याच ड्रेसमुळे, जाणून घ्या नक्की काय आहे कारण !

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Tassel fun. #grammys

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

सुप्रसिद्ध ग्रॅमी रेड कार्पेटवर निक जोनस आणि प्रियांका चोप्रा या पावर कपलने जलवा दाखविला. प्रियांकाचा बोल्ड लुक समोर आला असून तिच्या ड्रेसवर नेटकऱ्यांमध्ये बरीच उलट सुलट चर्चा सुरु आहे. एकीकडे तिच्या या हॉट आणि बोल्ड लुकला चाहत्यांनी पसंती दिली आहे. तर, दुसरीकडे नेटकऱ्यांनी हा लुक कॉपी केला असल्याने तिला ट्रोल केलं आहे.''आम्हाला हा लुक आवडला नाही'' असं आम्ही नाही तर, नेटकऱ्यांनी म्हणटलं आहे. 

X

प्रियांकाने घातलेल्या ड्रेसची फॅशन चक्क 20 वर्षांपूर्वी जेनिफर लोपेझ या अमेरिकन अभिनेत्रीनं केली होती. जेनिफरने घातलेला ड्रेस आणि प्रियांकाचा ग्रॅनीमधील ड्रेस हा मिळता जुळता आहे. जेनिफरने 2000 साली हिरव्या रंगाचा, डिपनेकचा ड्रेस घातला होता. आता प्रियांकानेही तशाच पद्धतीचा ड्रेस घातला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी प्रियांकाला ट्रोल केलं. 20 वर्षांपूर्वीही 'जेलो' म्हणजेच जेनिफरने ही फॅशन चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. पण, प्रियांकाला ते काही जमलं नसल्याचं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. 

प्रियांका चोप्रा जोनस नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी ड्रेसची किंवा फॅशनची कॉपी केली आहे. तर, अनेकांची फॅशन चुकुन सेमही झाली आहे. प्रियांकाचा 'द स्काय इज पिंक' हा चित्रपट नुकताच रिलिज झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.