श्रेयस तळपदे विरोधात चोरीचा आरोप, पोलिसांत तक्रार

Shreyas Talpade
Shreyas Talpade
Updated on

अभिनेता श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांनी सुप्रसिद्ध नाटक अलबत्या गलबत्याचा सेट चोरल्याचा आरोप निर्माता राहुल भंडारे यांनी केला आहे. गेली १५-१६ वर्षे नाट्य सृष्टीला सुपरहिट नाटकं देणारे अव्दैत थिएटरचे निर्माते राहुल मधुकर भंडारे यांच्या "अलबत्या गलबत्या" या नाटकाने अनेक विश्वविक्रम केले. नाटकासोबतच नाटकाचे आकर्षण ठरलेला नाटकाचा सेट देखील नाट्य क्षेत्रासहित प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे लॉकडाऊन काळात सर्व थेटर सहित नाट्यसृष्टी बंद आहे. त्यामुळे माझ्या अलबत्या गलबत्या या नाटकाचा सेट प्रवीण भोसले यांच्या गोडाउन मध्ये कोळसा बंदर, काळा चौकी येथे ठेवण्यात आला होता. मात्र तो सेट कोणतीही पूर्वकल्पना न देता सुरेश सावंत यांनी गोडाऊन मालकास खोटे सांगून गोडाऊन मधून चोरून श्रेयस तळपदे यांच्या OTT प्लॅटफॉर्म च्या भक्षक या एकांकिकेच्या शूटसाठी वापण्यात आला.

महाराष्ट्रभर नाट्यगृह चालू ठेवण्यास मनाई असतानादेखील लॉकडाऊन काळात शासनाच्या नियमाचे उल्लंघन करत, बेकायदेशीररित्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे अलबत्याचा गलबत्या नाटकाचा सेट वापरून कमर्शिअल शूटिंग करण्यात आल्याचा आरोप राहुल भंडारे यांनी केला आहे.

Shreyas Talpade
CM उद्धव ठाकरेंचा जनतेला मोठा इशारा, घेतला सर्वात मोठा निर्णय

अलबत्या गलबत्या या नाटकाच्या निघडीत सर्व प्रापर्टी आणि सेट हे अव्दैत थिएटर संस्थेची Intellectual property असून निर्माते राहुल भंडारे यांच्या परवानगीशिवाय वापरली. त्यामुळे ही शूटिंग कुठेही रिलीज करू नये, अन्यथा Intellectual property rights अंतर्गत श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा अर्ज शिवडी पोलिस स्थानकाला दिला आहे.

Shreyas Talpade
UGC च्या NET परीक्षेची तारीख जाहीर, पाहा डिटेल्स

निर्माते राहुल भंडारे यांचा तक्रार अर्ज शिवडी पोलिस स्थानकत स्वीकारला असून पोलिसांन मार्फत अभिनेते श्रेयस तळपदे सोबतच सुरेश सावंत यांची चौकशी होणार आहे. सोबतच शासनाचे लॉक डाऊनचे नियम मोडल्या बाबत त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो.

Shreyas Talpade
मॉल, रेस्टॉरंट रात्री दहापर्यंत खुले, मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?
Shreyas Talpade
पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली, खरीप संकटात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.