''नाक चांगले नाही म्हणून मला रीजेक्ट केलं होतं''

'छोरी' सिनेमाचा लीड सौरभ गोयलने सांगितलं बॉलीवूडमधलं खोचक सत्य...
''नाक चांगले नाही म्हणून मला रीजेक्ट केलं होतं''
Updated on

बॉलीवूड मध्ये हिरो किंवा हिरॉइन बनायचं असेल तर सुंदर असायलाच हवं. त्यातच नाकी-डोळी नीट नसतील तर निर्माते उभे देखील करत नाहीत,असं काही कलाकारांनीच स्टार बनल्यावर बोलून दाखवलंय. बरं सिनेमात लीड भूमिका मिळावी म्हणून कितीतरी जणांनी आपल्या नाकाची,ओठांची,तोंडाची,ब्रेस्टची,बटची आणि कशा-कशाची सर्जरी करून घेतली ह्याची लिस्टच निघेल. बरं त्या सर्जरी केल्यावर अनेक बड्या स्टारना लोकांच्या घाणेरड्या कमेंट्सना,जोक्सना सामोरं जावं लागलंय. अभिनेत्री अनुष्का शर्मा हे ज्वलंत उदाहरण. तिने ओठांची सर्जरी करून घेतली आणि तिच्यावर नको-नको त्या कमेंट्स केल्या गेल्या. पण अनुष्कानंही त्याला सडेतोड उत्तरं दिलीच.

''नाक चांगले नाही म्हणून मला रीजेक्ट केलं होतं''
रॅपर बादशहा विरोधातअभिनेत्री किरण खेर करणार तक्रार

पण जर चांगले चेहरेच सिनेमा लीड करतात असं म्हटलं तर गेल्या काही वर्षात इरफान खान,नवाझुद्दिन सिद्दिकी अशा कलाकारांनी हे समीकरण बदलून टाकलं. या दोघांना 'ना' चेहरा 'ना' बॉडी पण स्वत:च्या जीवावर त्यांनी सिनेमे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले. पण तरीही अजूनही चेहरा चांगला नाही म्हणून रीजेक्शन वाट्याला आलं असं ऐकलं की बॉलीवूडची मानसिकता बुरसटलेलीच आहे प्रकर्षाने लक्षात येते. असाच काहीसा अनुभव 'छोरी' स्टार सौरभ गोयलच्या वाट्याला आला होता चार वर्षांपूर्वी. पण हाच सौरभ गोयल आज 'छोरी' सिनेमात अभिनेत्री नुसरत भरुचासोबत लीड मध्ये आहे. 'छोरी'च्या निमित्तानं त्याने आपल्या सोबत झालेला तो प्रसंग बोलून दाखवला.

''नाक चांगले नाही म्हणून मला रीजेक्ट केलं होतं''
बापाविना स्ट्रगल करणा-या मुलाला 'भोजपुरीत जा' म्हणून हिणवले...

सौरभ म्हणाला,"चार वर्षांपूर्वी मी एका प्रतिथयश निर्मात्याकडे ऑडिशनसाठी गेलो होतो. तेव्हा त्याने मला सरळ सांगितले,'तुझे लुक्स लीड भूमिका करणा-या हिरोचे नाहीत. आणि तरिही तुला इच्छा असेल तर मग तुला सर्वप्रथम तुझ्या नाकाची सर्जरी करून घ्यावी लागेल'. ते ऐकून मला खूप वाईट वाटलं. मी आतून खचलो होतो पण ती वेळ ना दु:ख कुरवाळत बसण्याची होती ना पैसे होते माझ्याकडे सर्जरी करण्यासाठी. घरातनं सांगण्यात आलं सिनेमाचा नाद सोड. इथे काही करिअर तुझं होणार नाही. दुसरा जॉब शोध आणि लग्न करून सेटल हो. पण मी पुढे चालत राहिलो. जिद्द सोडली नाही, रोज ऑडिशन्स देणं सुरू ठेवलं. प्रयत्न सोडले नाहीत. नकार पचवायला शिकलो. पण त्यातनंच मी उभा राहिलो आणि आज 'छोरी' सिनेमात लीड अभिनेत्रीसोबत लीड भूमिका साकारतोय".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.