Protest Against Film Gadar-2 In Gurdaspur: सनी देओलचा मतदारसंघचं त्याच्यावर भडकला! गदर 2ला विरोध; पोस्टर जाळले अन्...
Protest Against Film Gadar-2 In Gurdaspur: बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल त्यांच्या आगामी चित्रपट गदर 2 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. तारा सिंग आणि सकीनाच्या भूमिकेत हे दोन्ही कलाकार शहरा-शहरात जाऊन चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत.
काही दिवसांपूर्वी सनी देओल आणि अमिषा पटेलअमृतसर सुवर्ण मंदिर आणि वाघा बॉर्डरवर पोहोचले होते.
अटारी बॉर्डरवर जावुन त्याने चित्रपटाचे प्रमोशन केले. यावेळी मात्र तो गुरदासपूरच्या इतक्या जवळ येऊनही त्याच्या मतदार संघात गेला नाही.
त्यामुळे गुरुदासपूरमधील लोक त्यांच्या खासदारावर नाराज झाले. सनी देओल लोकसभा निवडणुकीत गुरुदासपूर मतदारसंघातून निवडून आला आहे.
गुरुदासपूरमध्ये मंगळवारी सनी देओलच्या विरोधात लोकांनी निदर्शनं केली होती. रागावलेल्या लोकांनी सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाचे पोस्टर जाळले. इचकच नाही तर चित्रपटाला बॉयकॉट करण्याचे आवाहन केले.
अमरजोत सिंग आणि अमृतपाल यांनी सनी देओलला विरोध करत म्हणाले की, राजकारण हे एक खासदार सनी देओलसाठी एक असं व्यासपीठ ठरु शकलं असतं की ज्याद्वारे ते स्वतःला खरा हिरो असल्याचं सिद्ध करू शकले असते.
मात्र सनी देओल त्यात अपयशी झाला आहे. अमरजोत सिंह म्हणाले की, सनीवर लोकांनी विश्वास ठेवला होता मात्र त्याने लोकांना फसवले आहे. तो गुरुदासपूरला आला नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून गुरुदासपूरच्या रहिवासींनी त्यांच्या खासदाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. काही काळापुर्वी तेथील लोकांनी तो हरवला असल्याचे पोस्टरही लावले होते.
सनी देओलबद्दल त्यांनी राग व्यक्त केला आहे. यावेळीही सनीच्या वागण्याने लोक दुखावले आहेत. त्यांनी चित्रपटाचे पोस्टर जाळले आहेत.
सनी देओलचा चित्रपट गदर 2 या आठवड्यात 11 ऑगस्ट रोजी रिलिज होणार आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल व्यतिरिक्त अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा देखील दिसणार आहेत.
सनी देओलच्या लोकसभा मतदारसंघात त्याच्या चित्रपटाला विरोध होत असला तरी त्यांच्या चित्रपटाची इतर ठिकाणी जोरदार हवा आहे.
लोक चित्रपट पाहण्यासाठी उत्सूक आहेत. अॅडव्हान्स बुकिंगची आकडेवारी चांगली आहे. तर या चित्रपटासोबत अक्षयचा OMG2 देखील रिलिज होणार आहे. आता या दोन्ही चित्रपटात कोण बाजी मारते याकडे लक्ष लागले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.