PS 1 Review: पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण निव्वळ 'रटाळवाणा'

मुळातच टॉलीवूडचे चित्रपट जगभरातील हजारांहून अधिक स्क्रिनवर प्रदर्शित होतात. त्यांना मिळणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. साहजिकच होणारी कमाईही प्रचंड असते.
 ps 1 movie review
ps 1 movie reviewesakal
Updated on

PS 1 Review: प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पीएस 1 या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत अशा चित्रपटानं भलेही तिसऱ्याच दिवशी दीडशे कोटींची कमाई केली असेल मात्र ज्यांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहिला असेल त्यांना किती वेळ आपला संयम राखून ठेवला हे आवर्जुन विचारावे लागेल. मुळातच टॉलीवूडचे चित्रपट जगभरातील हजारांहून अधिक स्क्रिनवर प्रदर्शित होतात. त्यांना मिळणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. साहजिकच होणारी कमाईही प्रचंड असते. यातुलनेत बॉलीवूडच्या चित्रपटांना मिळणाऱ्या स्क्रिन्स या तुलनेनं कमी आहेत.

साऊथचा विशेषत जेव्हा एखादया प्रसिद्ध अभिनेत्याचा, दिग्दर्शकाचा चित्रपट प्रदर्शित होतो त्यावेळी तो पाहण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड उडते. महाराष्ट्रापेक्षा हे प्रमाण दक्षिणेकडील राज्यं आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये अधिक आहे. त्याचा फायदा हा चित्रपटांना होतो. हे लक्षात घेण्याची गरज आहे. आता गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षक मणिरत्नम यांच्या पीएस 1 चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेनं वाट पाहत होते. त्यात ऐश्वर्या बऱ्याच दिवसांनंतर प्रेक्षकांसमोर दिसणार होती. मोठी स्टारकास्ट घेऊन मणिरत्नम यांचा पीएस 1 चा प्रयोग काही अंशी यशस्वी झाल्याचे दिसून येते.

ज्यांनी गेम ऑफ थ्रोन्स पाहिली असेल त्यांना पीएस 1 फारसा काही प्रभावित करणार नाही. अर्थात गेम ऑफ थ्रोन्स आणि पीएस 1 यांचा प्रेक्षकवर्ग, फॉरमॅट वेगळआ असला तरी विषय मात्र बऱ्यापैकी सारखाच आहे. सत्ता, संघर्ष, द्वेष, प्रेम यासारख्या मानवी भावभावनांचे अनोखे मिश्रण या चित्रपटांमध्ये आपल्याला दिसते. पीएस १ मध्ये मणिरत्नम यांनी घेतलेली मेहनत दिसून येते. चित्रपटातील ग्राफीक्स प्रभावी आहे. छायाचित्रणानं कमाल केली आहे. तर सेट प्रचंड भव्य दिव्य आहे. आपल्याला आवर्जुन बाहुबली. आरआरआरची आठवण करुन देणारे काहीवेळेला त्यापेक्षाही काकणभर उंचीचे वाटणारे सेट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे पीएस 1 पाहताना आपण वेगळ्याच विश्वात वावरत असल्याचा भास न झाल्यास नवल.

* हिंदीतील डबिंग ऐकवत नाही...

पीएस 1 चे हिंदीतील डंबिग अनेकदा ऐकवत नाही. बऱ्याचदा टॉलीवूडचे चित्रपट पाहताना त्या चित्रपटाचा रसभंग करण्यात त्याचे डबिंग कारणीभूत ठरताना दिसते. पीएस मध्ये देखील त्याच्या झालेल्या रटाळ आणि किचकट डबिंगचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. त्यामुळे पीएस 1 पाहताना तो अधिक क्लिष्ट वाटू लागतो.

* ऐश्वर्याचं कौतूक करावं तेवढं कमीच.....

पीएस 1 मध्ये ऐश्वर्यानं कमाल केली आहे. ती कमालीची सुंदर दिसते आहे. भलेही नंदिनी (ऐश्वर्या) ही सुडानं पेटलेली पट्टराणी असेल मात्र त्या रागातही तिचं सौंदर्य खूपच प्रभावी आहे. तिचा मेकअप, तिची वेषभुषा, संवाद, एकुणच देहबोली लक्ष वेधून घेणारी आहे. तिच्या जोडीला असलेल्या त्रिशानं देखील प्रभावी अभिनय केला आहे. ती देखील प्रेक्षकांना भावली आहे. मणिरत्नम यांच्या पीएस1 चा थाट - बाट मात्र प्रेक्षकांना भुलवल्याशिवाय राहत नाही. पैसा वसूल चित्रपट आहे मात्र थोडा संयम ठेवून तो चित्रपट पाहण्याची गरज आहे. हे आवर्जुन सांगितलं पाहिजे.

 ps 1 movie review
Movie Review: भावनिक नातेसंबंधांवर भाष्य करणारा 'जुग जुग जिओ'

दोन भागांमध्ये पीएस 1 विभागलेला आहे. त्याचा पहिला भाग आता प्रदर्शित झआला आहे. अभिनेता अजय देवगणच्या आवाजात चित्रपट सुरु होतो. एक हजार वर्षांपूर्वीची गोष्ट आपल्यासमोर येते. ही गोष्ट आहे तंजावरचे सम्राट सुंदर चौळ (प्रकाश राज) आणि त्यांची दोन मुलं आदित्य करिकालन (विक्रम) आणि अरुणमौडी वर्मन (जयम रवि) त्यांची एक मुलगी कुंदवई (त्रिशा) यांची. आदित्यकडून एक चूक होते. तो युद्धात वीरपांड्याचा शिरच्छेद करतो. त्याचवेळी वीरपांड्याचे अंगरक्षक हे काहीही झालं तरी आपल्याला चौळ साम्राज्य नष्ट करणार अशी शपथ घेतात. सारा चित्रपट सुड उगवत आपल्या अंतिम ध्येयाच्या दिशेनं प्रवास करु लागतो.

 ps 1 movie review
Bramhastra: आलियाच्या 'ब्रम्हास्त्र'पुढं सारं फिकं! ती जिंकली

चौल साम्राज्याचा सेनापती पर्वतेश्वर या बाकीच्या मंत्र्यांसमवेत वेगळ्याच विचारात आहे. त्याची पत्नी नंदिनी (ऐश्वर्या रॉय) तिच्या मनात वेगळीच खलबतं सुरु आहे. हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर इतक्या संथपणे सरकत जातं की, काही वेळेला तो संथपणा डोक्यात जातो. आणि संयमाचा कडेलोट होतो. त्यामुळे पटकन चित्रपट क्लायमॅक्सपर्यत जावा अशी भावना प्रेक्षकांची झाल्याशिवाय राहत नाही. अरुणमोडीच्या विरोधात केलेलं कारस्थान त्याला राजधानीच्या शहरात बोलावून घेण्याची नंदिनीची चाल आणि एका समुद्री हल्ल्यात तो मृत्युमुखी झाल्याची बातमी सर्वांना धक्का देऊन जाते.

 ps 1 movie review
Nikki Tamboli: निक्कीला पाहावं, शांत व्हावं!

याठिकाणी पीएस 1 चा पहिला भाग संपतो. त्याच वेळी पुन्हा एक वेगळचं रहस्य दिग्दर्शकानं सांगून प्रेक्षकांना मोठा धक्का दिला आहे. ते रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी पीएस 1 पाहावा लागेल. पीएस 1 चा पुढील भाग 2023 मध्ये प्रदर्शित होणार असून त्याची उत्सुकता आतापासूनच प्रेक्षकांना लागली आहे. मात्र तो भाग पहिल्या भागाच्या तुलनेत अधिक वेगवान आणि उत्कंठावर्धक असेल अशी खात्री प्रेक्षकांना आहे. ऑस्कर विजेत्या संगीतकार ए आर रहमान यांच्या संगीताचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. त्यांनी दिलेल्या पार्श्वसंगीतानं, गाण्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. संगीत प्रभावी आहे. त्यामुळे पीएस 1 ची उंची आणखी वाढली आहे.

- चित्रपट - पीएस 1

दिग्दर्शक - मणिरत्नम

कलाकार - विक्रम, ऐश्वर्या, त्रिशा

रेटिंग - ***

-----------------------------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.