Pune University Ramleela Play Controversy : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित केंद्राच्या अंगणमंचावरील रामलीला विषयावरील नाटकावरुन मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विभाग प्रमुखांना 'रामलीला' प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विभागप्रमुखांचं अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सकाळी विभाग प्रमुख डॉ. प्रवीण भोळे आणि अन्य विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
शुक्रवारी रात्री घडलेल्या प्रकारानंतर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसह ललित कला केंद्राच्या अंगण मंचाला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. श्रीराम व सीतामाता यांच्या तोंडी शिव्या आणि आक्षेपार्ह संवाद वापरण्यात आल्याने, हे नाटक बंद पाडल्याची भूमिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घेतली आहे. तर रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्य दाखविण्याचा प्रयत्न या नाटकातून झाल्याचे समजते. 'जब वी मेट' या नावाची ही संहिता असून, विभागाच्या विद्यार्थ्यानेच त्याचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. हे नाटक प्रोयगिक आणि प्रहसनात्मक असल्याची माहिती उशीरापर्यंत समजली.
त्या नाटकात श्रीराम आणि सीता यांच्या तोंडी शिव्या आणि आक्षेपार्ह संवाद वापरण्यात आल्यानं हे नाटक बंद पाडण्यात आले अशी भूमिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं घेतल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेचे सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
दोन वर्षापर्यंतची शिक्षा :
विभाग प्रमुख आणि विद्यार्थ्यांवर धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान, हेतू पुरस्कर उद्देशाने केलेले अश्लील कृत्य आणि दंगा करण्याबद्दलची शिक्षा आदी कलमे लावण्यात आली आहे. यामध्ये सहा महिन्यांसह दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि दंडाची तरतूद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.