Puneeth Rajkumar : उपग्रहाला पुनीत राजकुमारचे नाव, लवकरच होणार लाॅन्च

प्रसिद्ध अभिनेते पुनीत राजकुमार आता आपल्यात नाहीत.
Puneeth Rajkumar
Puneeth Rajkumar esakal
Updated on

Puneeth Rajkumar Name Give To Satellite : कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पुनीत राजकुमार आता आपल्यात नाहीत. या अभिनेत्याला काही काळ लोटला असला तरी हा अभिनेता आजही त्याच्या चाहत्यांमध्ये जिवंत आहे. अभिनेत्याच्या स्मरणार्थ त्याचे चाहते अनेकदा काहीतरी करताना दिसतात.

दरम्यान, आता अभिनेत्याशी संबंधित एक नवीन बातमी समोर आली आहे. वास्तविक, पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांना श्रद्धांजली म्हणून नुकतेच पुनीत नावाचा उपग्रह श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केला जाणार आहे.

Puneeth Rajkumar
कोविड झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यात बदल, स्वतःच करतायत सर्व कामे

याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री सीएन असवंत नारायण म्हणाले, बंगळुरूमधील सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी १.९० कोटी रुपये खर्चून KGS3 उपग्रह विकसित केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निधन झालेल्या दिवंगत अभिनेत्या पुनीत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही या उपग्रहाचे नाव ठेवले आहे. १५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान हा उपग्रह (Satellite) प्रक्षेपित केला जाणार आहे. (Entertainment News)

Puneeth Rajkumar
'हास्यजत्रेचे' कलाकार अन् फडणवीसांची भेट, विनोदवीरांची केली प्रशंसा

त्यांनी पुढे सांगितले की, हा उपक्रम आझादीच्या अमृत महोत्सवाचा एक भाग आहे. सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयांमधून १००० विद्यार्थी निवडले जातील, ज्यांना श्रीहरिकोटाला भेट देण्याची आणि उपग्रह पुनीतच्या प्रक्षेपणाचे साक्षीदार होण्याची संधी मिळेल. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

यापूर्वी पुनीतला नुकतीच म्हैसूर विद्यापीठाने मरणोत्तर डॉक्टरेट प्रदान केले. विशेष म्हणजे, कन्नड (Kannad Movie) अभिनेता पुनीत राजकुमार यांचे २९ ऑक्टोबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'लकी मॅन' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.