Viral:'मागे तुझ्या फिरतो, झुरतो तुझ्यासाठी': 'श्रीवल्ली'चं मराठी व्हर्जन

सोशल मीडियावर सध्या टॉलीवूडच्या (tollywood movie) पुष्पाची (Pushpa) मोठी क्रेझ आहे.
Shrivalli Song
Shrivalli Song
Updated on

Pushpa Marathi Song viral: सोशल मीडियावर सध्या टॉलीवूडच्या (tollywood movie) पुष्पाची (Pushpa) मोठी क्रेझ आहे. दीड महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पुष्पाचं गारुड अजूनही प्रेक्षकांच्या मनावर आहे. अल्लु अर्जुनच्या (Allu Arjun) या चित्रपटामध्ये रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि समंथानं (Samantha Akkineni)देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडीयावर पुष्पातील गाण्याचे, डायलॉगचे रील्स मोठ्या प्रमाणात तयार केले गेले आहे. आबालवृद्धांपासून लहान मुलांपर्यत सर्वांना पुष्पानं वेड लावले आहे. पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता तो ओटीटीवरूनही अनेक भाषांमधून प्रेक्षकांपर्यत गेला आहे. पुष्पातील श्रीवल्ली गाण्याचे वेगवेगळ्या भाषांमध्ये व्हर्जन तयार करण्यात आले आहे. (Pushpa Song Viral On Ott different Versions)

यापूर्वी मराठीतही श्रीवल्ली गाण्याचे व्हर्जन तयार करण्यात आले होते. त्याला मराठी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आताही असेच श्रीवल्लीचे मराठी व्हर्जन व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्याला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या आहेत. सौरभ साळुंखे यांनी श्रीवल्ली हे गाणं मराठीमध्ये गायलं आहे. तमिळ श्रीवल्लीचं त्यांनी मराठीत केलेलं भाषांतर लोकांना विशेष आवडल्याचे दिसून आले आहे. मागे तुझ्या फिरतो, झुरतो तुझ्यासाठी 'श्रीवल्ली' अशा प्रकारचे बोल त्या गाण्याचे असून आतापर्यत त्या गाण्याला तीस हजारांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

युट्युबवर हे गाणे व्हायरल झाले आहे. श्रीवल्लीच्या वेगवेगळ्या व्हर्जन्सला चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. त्याचे मराठमोळे व्हिडिओही तयार करण्यात आले आहे. इंस्टावर पुष्पाचे तर दिवसभरात कित्येक क्रिएटिव्ह रिल्स तयार होत असल्याचे दिसून आले आहे. सध्याच्या श्रीवल्लीच्या मराठमोळ्या व्हर्जन्सचं चाहत्यांनी कौतूक केलं आहे. सौरभ यांनी या व्हर्जन्सच्या कामात मदत झालेल्या विघ्नेश जोशी यांचेही आभार मानले आहे.

Shrivalli Song
Pushpa: ३०० गाड्या, १५०० लोक, 'पुष्पा'च्या शूटिंगची गोष्ट निराळी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.