Pushpa 2 News: चित्रपट मनोरंजन विश्वात अल्लु अर्जुनच्या पुष्पानं धुमाकूळ घातला होता. पुष्पा नावाचं वादळं आलं आणि त्यावेळी बॉक्स ऑफिसवर बॉलीवूडचे जेवढे चित्रपट प्रदर्शित झाला त्याचा जोरदार तडाखा या चित्रपटानं दिला होता. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाविषयीची एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक अल्लु अर्जुनच्या पुष्पाच्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. या चित्रपटाला पूर्ण देशातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिक्वेल प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटानं एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआऱचा रे़कॉर्ड ब्रेक केला आहे. पहिल्या पुष्पा द राईज नंतर त्याचा पुष्पा द रुल नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पा द रुलनं बॉक्स ऑफिसवर झळकण्यापूर्वीच आपला प्रभाव दाखवून दिला आहे. त्यामुळे येत्या काळात पुष्पाला मिळणारा प्रतिसाद किती भव्य दिव्य असणार आहे हे दिसून येत आहे. पुष्पानं कमाईच्या बाबत आरआऱआऱला देखील मागे सोडल्याची माहिती पुढे येत आहे. सियासेटनं दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी थिटएर्स असोशिएशनला चित्रपटाच्या राईट्स घेण्यासाठी हजार कोटींची ऑफर ठेवली आहे.
पुष्पा द रुल हा तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणाऱ्या पुष्पा द रुल साठी एवढी डिमांड नाही. पण हिंदी आणि तेलुगू मध्ये जो सिक्वेल डब होणार आहे त्याची मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच एका वेगळ्या विषयामुळे चर्चेत आला आहे. यापूर्वी पुष्पाच्या पहिल्या भागानं मेकर्सला ९०० कोटींची कमाई करुन दिली होती.
सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या पुष्पाविषयी नेहमीच चाहत्यांना उत्सुकता राहिली आहे. जगभरातू या चित्रपटानं ३५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. त्यावरुन त्याचा प्रभाव दिसून येईल. इंडस्ट्रीतील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पाच्या सिक्वेलला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र यासगळ्यात अद्याप थिएट्रिकल राईट्सची आकडेवारी समोर आलेली नाही. पुष्पा द राईज हा १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.