Your Name : अ‍ॅनिमे फॅन्ससाठी पर्वणी! थिएटरमध्ये पाहता येणार 'युवर नेम'सह माकोतो शिनकाईचे टॉप सिनेमे

'सुझुमे' चित्रपटाच्या यशानंतर आता पीव्हीआरने माकोतो शिनकाई फिल्म फेस्टिवलचे आयोजन केले आहे.
Your Name
Your NameEsakal
Updated on

अ‍ॅनिमेची क्रेझ भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. हेच पाहून गेल्या काही वर्षांपासून देशात अ‍ॅनिमे मूव्हीज (Anime Movies in India) रिलीज होण्याचं प्रमाणही वाढत चाललं आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'सुझुमे' चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता पीव्हीआरने थेट माकोतो शिनकाई फिल्म फेस्टिवलचे आयोजन केले आहे. १९ मे पासून पुढे देशभरात हा फेस्टिवल सुरू असेल.

सुझुमे ठरला ब्लॉकबस्टर

दिग्दर्शक माकोतो शिनकाई (Makoto Shinkai) यांचा लेटेस्ट 'सुझुमे' हा चित्रपट भारतात २१ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने चक्क सलमान खानच्या 'किसी का भाई...' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली. सुझुमेने पुढील दहा दिवसांमध्ये तब्बल ६.९५ कोटी रुपयांची कमाई करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. एका अ‍ॅनिमे चित्रपटासाठी भारतात ही कमाई रेकॉर्डब्रेक आहे.

सुझुमेचं हे यश पाहून पीव्हीआरने (PVR Anime) भारतात माकोतो शिनकाई यांचे काही ब्लॉकबस्टर अ‍ॅनिमे मूव्हीज पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय घेतला. १९ मे पासून पीव्हीआर शिनकाई (Makoto Shinkai Film Festival) यांचे पाच ब्लॉकबस्टर चित्रपट भारतातील विविध चित्रपटगृहांमध्ये दाखवणार आहे.

'युवर नेम'चा समावेश

माकोतो शिनकाई यांचा जगभरात गाजलेला 'युवर नेम' हा अ‍ॅनिमे मूव्ही या फेस्टिवलमध्ये (Your Name in India) दाखवण्यात येणार आहे. भारतातील अ‍ॅनिमे फॅन्ससाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. २०१६ साली रिलीज झालेल्या या चित्रपटाने कित्येक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले आहेत. काही वर्षांपर्यंत हा सर्वाधिक कमाई करणारा अ‍ॅनिमे चित्रपट होता.

युवर नेम सोबतच या फिल्म फेस्टिवलमध्ये 'वेदरिंग विथ यू', '५ सेंटिमीटर्स पर सेकंड', 'चिल्ड्रन हू चेज लॉस्ट व्हॉईसेस' आणि सुझुमे हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. हे सर्व चित्रपट (Makoto Shinkai Films) जपानी भाषेत, इंग्रजी सबटायटल्ससह दाखवण्यात येतील.

भारतात वाढतंय अ‍ॅनिमे कल्चर

२०१९ साली आलेला 'वेदरिंग विथ यू' (Weathering With You) हा माकोतो शिनकाई यांचा भारतात रिलीज झालेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे देशात आणखी अ‍ॅनिमेपटांसाठी वाट मोकळी झाली. गेल्या वर्षी भारतात 'जुजुत्सु काईसेन ०' या अ‍ॅनिमेपटाने सुमारे ५.४ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, याच वर्षी आलेल्या 'डीमन स्लेयर : स्वॉर्डस्मिथ व्हिलेज आर्क' या चित्रपटाने ४.४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.