R Madhavan Birthday: आर. माधवनचं कोल्हापूरशी आहे नादखुळा कनेक्शन! जावई आणि झणझणीत मिसळ..

अभिनेता आर. माधवन यांचा आज वाढदिवस..
R Madhavan Birthday kolhapur connection education love life he loves misal
R Madhavan Birthday kolhapur connection education love life he loves misal Sakal
Updated on

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलीवुडलाही वेड लावणारा अभिनेता म्हणजे 'आर. माधवन..' आजही त्याला अनेकजन 'मॅडी' याच नावाने ओळखतात. कारण 'सच कह रहा है दिवाना' म्हणून त्याने मनामानत घर केलं ते कायमचं..

आर. माधवन याने आजवर अनेक चित्रपट केले आणि गाजवलेही. आजच्या आधुनिक युगातही परंपरा जपणारा अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे चाहते त्याच्यावर कायमच फिदा असतात. अशा आर माधवनचा आज वाढदिवस..

या दाक्षिणात्य कलाकाराचं आपल्या कोल्हापूरशी एक खास कनेक्शन आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया काय आहे हे कनेक्शन..

(R Madhavan Birthday kolhapur connection he loves misal)

R Madhavan Birthday kolhapur connection education love life he loves misal
Maharashtra Shaheer: 'महाराष्ट्र शाहीर'चा डफ आता OTT वर कडाडणार! कधी, कुठे आणि कसा पाहाल?

आर. माधवनचं खरं नाव आहे, रंगनाथन माधवन.. त्याच्या नावावरून तो दक्षिणेतील हीरो अशी त्याची ओळख असली तरी तो महाराष्ट्राशी मनाने जोडला आहे. त्यातही त्याचे कोल्हापूरशी खास नाते आहे.

मुंबईत वाढलेल्या आर. माधवन शिक्षणासाठी कोल्हापूरला गेला होता. त्यामुळे त्या मातीशी याचं वेगळंच इमान आहे. तो कायमच कोल्हापूरविषयी भरभरून बोलत असतो. माधवनने कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. त्यामुळे जवळपास पाच वर्षे तो कोल्हापुरात होता.

आधी राजाराम हॉस्टेल आणि मग राजारामपुरीत भाड्याच्या खोलीत राहायचा. जेवायला फक्कड मराठमोळी मेस आणि अभ्यासाला शिवाजी विद्यापीठाची लायब्ररी असा त्याचा कोल्हापूर प्रवास आहे.

R Madhavan Birthday kolhapur connection education love life he loves misal
Phakaat Movie: सुयोग-रसिकानं सांगितलं त्यांच्या नात्यातलं खास गुपित.. घर शेयर करण्यापासून ते..

शिक्षणानंतर आर. माधवनने कोल्हापूरमध्येच पुढचा काही काळ तो वास्तव्यास होता. यावेळी त्याची भेट सरिता बेर्जे हिच्याशी झाली आणि तिथेच तो एका कोल्हापुरी पोरीच्या प्रेमात पडला. मग दोघांनी 1999 मध्ये लग्न केले आणि आर. माधवन कोल्हापूरचा जावई झाला.

आता जावई म्हंटलं की कोल्हापुरी जेवण आलंच. त्यामुळे झणझणीत मिसळ पाव हा देखील माधवनच्या आवडीचा पदार्थ आहेत.

एवढेच नाही तर कोल्हापुरात शिक्षण झाल्यां विश्वास नांगरे पाटील, सतेज पाटील आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याशी त्याचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.