R Madhavan Latest News आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. अक्षय कुमारच्या रक्षाबंधन चित्रपटालाही प्रेक्षक मिळाले नाही. बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचे प्रकार सोशल मीडियावर सुरू आहेत. बॉलिवूडच्या बहिष्कारावर आतापर्यंत अनेकांची वक्तव्ये आली आहेत. आता आर माधवन (R Madhavan) यानेही भाष्य केले आहे.
लाल सिंग चड्ढा या चित्रपटात करीना कपूर, आमिर खान आणि नागा चैतन्य सारखे मोठे स्टार आहे. तरीही चित्रपट सहा दिवसांत ५० कोटींचा आकडाही पार करू शकला नाही. त्याचबरोबर यापूर्वीही अनेक चित्रपटांमध्ये हीच परिस्थिती होती. अक्षय कुमारचे रक्षाबंधन, सम्राट पृथ्वीराज, शमशेरा यासह अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फॉप झाले.
दुसरीकडे पुष्पा, आरआरआर, केजीएफ चॅप्टर २, विक्रम आणि विक्रांत रोना या चित्रपटांनी चांगली कमाई केली. या चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्या प्रचंड गाजत होत्या. आता आर माधवनही या मुद्द्यावर बोलला. चांगले चित्रपट बनले तर चालतील. कोरोनानंतर लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. याबाबतीत आपण थोडे पुरोगामी व्हायला हवे, असा माधवन म्हणाला.
आपण चुकीचा चित्रपट (Movies) बनवत आहोत, असे कुणालाही वाटत नाही. लाल सिंग चड्ढामागे प्रत्येक चित्रपटासाठी कलाकारांइतकी मेहनत आणि समर्पण होते. साऊथचे चित्रपट खूप चांगले काम करीत आहे, ही संकल्पना चुकीची आहे. कारण, साऊथ इंडस्ट्रीचे मोजकेच चित्रपट गाजले आहेत. याला पॅटर्न म्हणता येणार नाही, असा माधवन (R Madhavan) म्हणाला.
चांगला चित्रपट आला तर नक्कीच चालेल
बाहुबली १, बाहुबली २, आरआरआर, पुष्पा, केजीएफ १ आणि केजीएफ २ हे एकमेव चित्रपट होते, ज्यांनी हिंदी चित्रपट कलाकारांच्या चित्रपटांपेक्षा जास्त कमाई केली. हे फक्त सहा चित्रपट आहेत. चांगला चित्रपट आला तर नक्कीच चालेल, असाही माधवन साऊथच्या चित्रपटांबद्दल म्हणाला. कोरोनानंतर लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. लोकांनी चित्रपट पहावेत असे वाटत असेल, तर थोडेसे प्रगतीशील चित्रपट बनवले पाहिजे, असाही तो म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.