माझ्या गर्लफ्रेंडसोबत 'ती' गोष्ट करताना पोलिसांनी ब-याचदा पकडलंय...

अभिनेता आर.माधवननं सांगितले लग्नाआधीचे बायकोसोबतचे धम्माल किस्से
R Madhavan, wife Sarita Birje.
R Madhavan, wife Sarita Birje.Google
Updated on

अभिनेता आर.माधवनला चांगलं मराठी कळतं,उत्तम बोलता येतं. आता यामागचं कारण म्हणजे त्यानं त्याचं इंजिनिअरिंगचं शिक्षण कोल्हापूरमध्ये केलंय,जिथे त्याचे मित्र-मैत्रिणी मराठी कुटुंबातले होते. तर एवढंच नाही त्याची बायको माहेरची सरिता बिर्जे आहे,म्हणजे मराठीच की हो. त्यांना एक मुलगा आहे जो उत्तम जलतरणपट्टू आहे. आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आर.माधवन हा त्याच्या अभिनयामुळे जितका प्रेक्षकांच्या जवळ आहे तितकाच तो एक उत्तम माणूस म्हणूनही ओळखला जातो. त्यानं त्याच्या मुलाला बॉलीवूड सर्कलपासनं लांब ठेवत ज्याप्रकारे वाढवलंय ते वाखाणण्याजोगं. मागे आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी पकडल्यानंतर आर.माधवननं त्याच्या मुलाला दिलेल्या चांगल्या संस्काराच्या बातमीची खूप चर्चा होत होती. पण हयाच आर.माधवननं बायकोसोबतचे लग्नाआधीचे असे काही किस्से सांगितले आहेत की जे ऐकून आपण सगळे थक्क व्हाल.

R Madhavan, wife Sarita Birje.
''आई तु या जगातील सर्वात पुढारलेली महिला आहेस,दुलारी रॉक''- अनुपम खेर

आर.माधवनचे लग्न होण्यापूर्वी सात ते आठ वर्षे त्याची बायको आणि तो रीलेशनशीपमध्ये होते. त्याविषयी सांगताना तो म्हणाला,''त्यावेळी आम्ही मुंबईत एकत्र अनेक रोमॅंटिक स्पॉटवर फिरायचो. बान्द्र्यातील बॅंडस्टॅंड बीच हा त्यापैकीच एक. पण तिथेही गर्दी असली की आम्ही जायचो डबल डेकर बसमध्ये वरच्या डेकवर. त्या वयात नकळत इंटिमेट व्हायचो आणि मग ब-याचदा मोठ्या कोणीतरी पाहिलं की ते ओरडले आहेत,नाहीतर बीचवर तर अनेकदा पोलिसांनी पकडलंय,आणि म्हणालेत 'घरी जा'. ते वयंच थोडं वेडं होतं. चुकून काहीतरी करायचो पण नशीब बलवत्तर की तुरूंगात पोलिसांनी नेलं नाही ना मोठ्यांना फोन करून सांगितलं. फक्त आम्हाला समज देऊन सोडलं''. बायकोसोबतचे असे अनेक धम्माल किस्से आर.माधवनने एका मुलाखतीत शेअर केले.

R Madhavan, wife Sarita Birje.
EXCLUSIVE : अखेर श्रद्धा कपूरनं केला माधुरी दिक्षितचा पत्ता कट

बॉलीवूडसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही तितकाच पसंत केला जाणारा अभिनेता आर.माधवन आता ओ.टी.टी प्लॅटफॉर्मवरही काम करताना दिसतो. नेटफ्लिक्सवर लवकरच त्याची एक वेबसिरीज आपल्या भेटीस येत आहे.सुरवीन चावलाही त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसच 'रॉकेट्री-द नाम्बी इफेक्ट' या सिनेमाच्या माध्यमातनं तो दिग्दर्शक म्हणून आपली इनिंग सुरू करीत आहे. 'नाम्बी नारायण' या वैज्ञानिकाच्या आयुष्यावर आधारित या सिनेमाचं कथानक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.