अभिनेता आर माधवन हा त्याच्या वैयक्तिक आयूष्यामुळंही चर्चेत आसतो. तो त्याच्या परिवाराबद्दलही तो नेहमीच बोलत असतो. आर माधवन चा मुलागा हो एक उत्तम खेळाडू आहे हे तर सर्वांनाच माहित आहे. मात्र आज आर माधवनसाठी खुप महत्वाचा आनंदाचा तितकाच खूप अभिमानाचा क्षण आहे. खरं तर त्याचा मुलगा वेदांत माधवनने 'खेलो इंडिया युथ गेम्स 2023' मध्ये एक-दोन नव्हे तर सात पदके जिंकली.
वेदांतने या गेममध्ये 5 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक जिंकली आहेत. मुलाच्या या यशावर आर. माधवनच्या आनंदाला पारावार उरला नाही. सोशल मीडियावर सर्व खेळाडूंच्या विजयाचे अभिनंदन करताना त्यांने वेदांतसाठीही पोस्ट शेअर केली आहे.
आर माधवनने ट्विटरवर वेदांतचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो जिंकलेले पदक आणि हातात ट्रॉफीसोबत दिसत आहे. यासोबतच माधवनने हेही सांगितले की वेदांतने कोणत्या स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे.
आर माधवनने ट्विटमध्ये म्हटले आहे की, वेदांतने १०० मीटर, २०० मीटर आणि १५०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले, तर ४०० मीटर आणि ८०० मीटर स्विमिंगमध्ये रौप्यपदक जिंकले. दुसर्या ट्विटमध्ये आर माधवनने लिहिले आहे की, अपेक्षा फर्नांडिस आणि वेदांतसह सर्वांची कामगिरी पाहून खूप आनंद झाला आहे. त्याला खूप अभिमान वाटत आहे.
एखाद्या अभिनेत्याचा मुलगा हा अभिनय क्षेत्रातच करियर करण्याला प्राधान्य दिले. पण आर माधवनच्या मुलाने वेगळं क्षेत्र निवडलचं नाही तर त्यात उत्तम कामगिरीही केली आहे. वेदांतने स्वतःची एक ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला.
देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे वेदांतचे स्वप्न असून तो यासाठी परिश्रमही घेत आहे. आर माधवन यांनेही वेदांतला नेहमीच पाठिंबा दिला आहे. त्यांला आनंद आहे की त्यांचा मुलगा केवळ देशालाच नव्हे तर इतर जगातही नाव मिळवून देत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.