Raanjhanaa 10 Years: नस कापली, पाणीपुरी खायला दिली.. कुंदन झोयाच्या रांझणा लव्हस्टोरीची 10 वर्ष

Raanjhanaa 10 Years:
Raanjhanaa 10 Years:Esakal
Updated on

10 Years Of Raanjhanaa: दिग्दर्शक आनंद एल राय यांनी प्रेक्षकांना नेहमीच सुपरहिट चित्रपटाची मेजवानी दिली आहे. त्याच्या नवनवीन कथा आणि त्यांच्या सुपर हीट चित्रपटाच्या चर्चा इंडस्ट्रीत होतच असते. “तनु वेड्स मनू” पासून ते " रक्षाबंधन " या चित्रपटापर्यंत संगीत हा त्याच्या चित्रपटांचा अविभाज्य भाग आहे.

दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या चित्रपटातील गाणे हे नेहमीच हिट होतात. त्या गाण्यामुळेच प्रेक्षकांना हे चित्रपट भावतात. त्याचा 'रांझना' या सुपरहीट चित्रपटाला तर कुणीच विसरु शकत नाही. लवकरच या चित्रपटाला १० वर्ष पूर्ण होणार आहेत.

Raanjhanaa 10 Years:
Adipurush Akhilesh Yadav: सेन्सॉर बोर्ड धृतराष्ट्र झालंय का? समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आदिपुरुषवर संतापले

एक दशकाचा प्रवास साजरा करताना आजही या चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान आणि प्रख्यात गीतकार इरशाद कामिल यांचा साउंडट्रॅक या चित्रपटातून प्रचंड गाजला.

Raanjhanaa 10 Years:
Rakesh Master Passes Away: प्रसिद्ध कोरिओग्राफरचे वयाच्या 53व्या वर्षी गंभीर आजाराने निधन..

आनंद एल राय आणि ए.आर.रहमान यांचा हा पहिला चित्रपट होता.रांझना, बनारसिया, पिया मिलेंगे, तुम तक, और ऐसे ना देखो या गाण्यांची चर्चा आजही होते. या गाण्याचा वेगळा प्रेक्षक वर्ग आहे. अलीकडेच सोशल मीडिया वर रांझना हे गाणं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसलं आहे. यावर अनेक रिल्सही सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

Raanjhanaa 10 Years
Raanjhanaa 10 Years

या चित्रपटातून धनुषने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अभिनयाची छाप सोडली. धनुषच्या अभिनयाने लोकांना सर्वांना आश्चर्यचकित केले.

या चित्रपटात त्यांने कुंदन या बनारसमधील पंडिताची भूमिका साकारली होती, जो एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडतो. त्याच्यासोबत सोनम कपूरने स्क्रिन शेयर केली होती. यादोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली.

रांझना हा चित्रपट दहा वर्षा पूर्वी देखील तितकाच सुपरहिट होता आणि आत्ताही सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो.

Raanjhanaa 10 Years:
Adiuprush memes : 'कट्टापानं बाहुबलीला मारलं कारण त्यानं 'आदिपुरुष' पाहिला होता'!

प्रेम कहाणी च्या पलिकडे जाऊन या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली. दमदार कथा आणि अनोख्या गाण्याची पर्वणी असणारा हा खास चित्रपट आजही प्रेक्षकांच्या हृदयात आहे यात शंका नाही.

आजही प्रेक्षक हा चित्रपट आवडिने पाहतात. 21 जून 2013 रोजी रिलीज झालेला 'रांझना' रिलीज होऊन 10 वर्षे पूर्ण करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.