राधिकाला मिळाला होता 'बोटोक्स सर्जरी' करण्याचा सल्ला;वाचा 'ते' डार्क सीकेट

मराठमोळ्या राधिका आपटेनं आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये भक्कम स्थान बनवलं आहे.
Radhika Apte: Jokes on colour, body shaming should not be encouraged
Radhika Apte: Jokes on colour, body shaming should not be encouragedGoogle
Updated on

राधिका आपटेनं(Radhika Apte)अभिनयाच्या बळावर इंडस्ट्रीत स्वतःला सिद्ध केलं आहे. आता बॉलीवूड(Bollywood) मध्ये आपली जागा बनवायची हे काही सोपं काम नाही. नुकत्याच एका मुलाखतीत राधिकानं सांगितलं होतं की,ती जेव्हा बॉलीवूडमध्ये नवीन होती तेव्हा तिला बॉडी शेमचा सामना करावा लागला होता.तिला नाक सरळ करण्यापासून ते ब्रेस्ट सर्जरी पर्यंत करण्यास सांगितलं गेलं होतं. एवढंच नाही तर सल्ले देणाऱ्यांनी तिला पायापासून तोंडाच्या जबड्यापर्यंत काही ना काही नीट करुन घेण्यास सांगितलं होतं. इंडस्ट्री मध्ये असे सजेशन्स काही नवी गोष्ट नाही. बऱ्याच अभिनेत्रींना अशा प्रकारच्या सर्जरी करण्यास सांगितलं गेलं आहे. चला जाणून घेऊया राधिका आपटेला नेमके काय-काय सल्ले याबाबतीत देण्यात आले होते.(Radhika Apte: Jokes on colour, body shaming should not be encouraged)

Radhika Apte: Jokes on colour, body shaming should not be encouraged
'Unprofessional Govinda'; बॉलीवूडच्या आरोपांना वैतागलाय अभिनेता, म्हणाला...

राधिका आपटे 'पार्च्ड' सारख्या सिनेमातनं एकदम बोल्ड अभिनय करताना आपल्याला दिसली आहे. तर दुसरीकडे 'बदलापूर','अंधाधुन' सारख्या सिनेमांतून तिनं साकारलेल्या अभिनयाचं कौतूकही करण्यात आलं आहे. राधिका आपटेनं एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. ती म्हणालीय,''मी जेव्हा नवीन होते तेव्हा माझ्यावर मोठं प्रेशर असायचं. मला माझ्या ब्रेस्ट आणि चेहऱ्यावर खूप बदल करण्यास सांगितले होते. कामानिमित्तानं केलेल्या पहिल्या एका मीटिंगमध्ये मला सांगितलं गेलं होतं की नाकाची सर्जरी करून घे. दुसऱ्या मीटिंगमध्ये बेस्ट सर्जरी करुन घ्यायला सांगितली होती. मला पायावर देखील काहीतरी करुन घ्यायला सांगितलं होतं. ज्या सर्जरीचं नाव थोडं विचित्र होतं. नंतर माझ्या तोंडाच्या जबड्याला आणि गालांना देखील थोडं भरल्यासारखे वाटण्यासाठी सर्जरी कर म्हणाले होते,पुढे काहीच नाही तर बोटोक्स सर्जरी करायला सांगितली होती. ही सर्जरी त्वचा तजेलदार दिसण्यासाठी केली जाते. त्वचेला सुरुकूत्या असतील तर ही सर्जरी करतात''.

Radhika Apte: Jokes on colour, body shaming should not be encouraged
'तारक मेहता..' ला सापडली नवीन दयाबेन? अभिनेत्री श्रद्धा आर्याचं नाव चर्चेत

राधिका पुढे म्हणाली कि,'' मी मात्र या सल्ल्यांना फार मनावर घेतलं नाही. ना या सल्ल्यांमुळे माझ्यातला आत्मविश्वास डगमगला. मी स्टायलिश दिसण्यासाठी जे केस कलर वगैरे करतात त्यासाठीही वयाची तिशी गाठली. मी आता पुढेही काही इंजेक्शन वगैरे घेणार नाही. उलट या सगळ्या विचित्र सल्ल्यांमुळे एक गोष्ट घडली ती म्हणजे माझ्या शरीरावर मी अधिक प्रेम करायला शिकले,त्याची काळजी घ्यायला शिकले अन् त्याचा आदर करायला शिकले जे सर्वात महत्त्वाचं आहे''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.