बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चढ्ढा त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. परिणीती आणि राघव लवकरच एंगेजमेंट करणार आहेत. उद्या म्हणजेच13 मे रोजी आप खासदार राघव चढ्ढा आणि बॉलिवूडची पंजाबी गर्ल परिणीती चोप्रा हे एंगेजमेंट करणार आहे.
परिणीती आणि राघवच्या एंगेजमेंटची तयारी ही मुंबईच नव्हे तर दिल्लीतही सुरू आहे. दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून सोबत दिसत आहे. नुकतच त्यांनी आयपीएल पाहण्यासाठी एकत्र स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. आता दोघही त्याच्या नात्याला नवी नाव देण्यासाठी उत्सूक आहे.
दोघांची एंगेजमेंट पंजाबी रितीरिवाजांनुसार होणार आहे. केवळ परिणिती आणि राघवचे कुटुंबातील सदस्य आणि खास मित्र या एंगेजमेंटला उपस्थित राहणार आहेत. परिणीतीनेही एंगेजमेंटसाठी खास थीम ठेवली आहे.
साखरपुड्याच्या तयारीसाठी परिणिती एक दिवसआधीच दिल्लीला पोहचली होती. ड्रेसपासून तर सजावटीपर्यंत सर्वच गोष्टींसाठी एक स्पेशल थीम ठेवण्यात आली आहे. दोघांचेही कुटूंब हे पंजाबी असल्यानं पंजाबी प्रथेनुसार सगळे कार्यक्रम पार पडणार आहे.
एंगेजमेंटपूर्वी दुपारी १२-१ वाजेच्या सुमारास सुखमणी साहिबचे पठण होईल. अरदास नंतर भोजनाचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी रिंग सेरेमनीची पार्टी होईल. अतिशय साधेपणाने आणि सोप्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राघव -परिणितीच्या लग्नाला सुमारे 13 ते 150 लोक उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य, परिणीतीची बहीण प्रियांका चोप्रा आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचा समावेश असेल.
परिणीती चोप्रा तिच्या एंगेजमेंटमध्ये प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला ड्रेस घालणार आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी ही अभिनेत्री मनीष मल्होत्राच्या घरीही स्पॉट झाली होती.
दरम्यान कालपासून सोशल मिडियावर परिणीतीच्या आलिशान घराचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, तिच्या घरात एंगेजमेंटची तयारी सुरू झाली आहे. घराचा बाहेरचा भाग अनेक दिव्यांनी नववधूसारखा सजवण्यात आला आहे. परिणीतीचे घर मुंबईतील वांद्रे भागात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.