Video Viral : राहत फतेह अली खान दिसले नशेत; पाकिस्तानी गायक पुन्हा चर्चेत

गायकाची अवस्था बघून सोशल मीडियावर ट्विटचा पाऊस सुरू झाला आहे
Rahat Fateh Ali Khan Latest News
Rahat Fateh Ali Khan Latest NewsRahat Fateh Ali Khan Latest News
Updated on

Rahat Fateh Ali Khan Latest News पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. १६ ऑगस्ट रोजी त्यांनी काका उस्ताद नुसरत फतेह अली खान यांना २४ व्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली होती. राहत फतेह अली खानच्या पोस्टला २४ तासही उलटले नाही आणि सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आले आहे. राहत फतेह अली खान यांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये ते दारूच्या नशेत (Drunk) व्यवस्थापकाशी बोलताना दिसत आहे.

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. एखादी व्यक्ती प्रेमात पडली असेल किंवा कोणाचे ब्रेकअप झाले असेल, प्रत्येक वातावरणात या गायकाची गाणी दिलासा देणारी असतात. मात्र, आता राहत फतेह यांचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये राहत फतेह अली खान त्यांचे काका नुसरत फतेह अली खान यांच्या व्यवस्थापकावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये राहत फतेह हे नुसरत फतेह अली खानच्या व्यवस्थापकाच्या खांद्यावर हात ठेवताना दिसत आहे. ‘आम्ही एक आहोत आणि नेहमीच एक राहू’ असे राहत फतेह अली खान मिठी मारताना म्हणतात. पाकिस्तानी (Pakistan) गायकाची ही अवस्था बघून सोशल मीडियावर ट्विटचा पाऊस सुरू झाला आहे. व्हिडिओमध्ये राहत फतेह अली अडखळत बोलत असल्याचे दिसत आहे. त्यांच्याकडे बघून ते नशेत (Drunk) असल्याचे दिसते. कारण, याआधी ते कधीही असे दिसले नाही.

नुसरत फतेह अली खान हे पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक होते. त्यांच्या आवाजाची जादू जगभर होती. आज ते आपल्यात नाही. परंतु, गायलेली गाणी त्यांना कधीच विसरू देणार नाही. राहत फतेह अली खान आपल्या काकांची आठवण काढण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ते नुसरत फतेह यांच्या आठवणीत भावुक होताना दिसले होते.

Rahat Fateh Ali Khan Latest News
Box Office Collection : आमिर, अक्षयमध्ये जोरदार टक्कर; कोण अधिक फ्लॉप?

नुसरत अली खान हे केवळ प्रसिद्ध गायकच नव्हते तर उत्तम संगीत दिग्दर्शक आणि गीतकार देखील होते. १६ ऑगस्ट १९९७ रोजी वयाच्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. अनेक अहवालामध्ये त्यांचा मृत्यू जास्त वजनामुळे झाल्याचा दावाही करण्यात आला होता. राहत फतेहनंतर त्यांचा संगीताचा वारसा पुतणे राहत फतेह अली खान आणि रिझवान मुअज्जम यांनी पुढे नेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.