Rahul Gandhi Disqualified : 'गुजरातची न्यायालयं ही भाजपची...'कुणाल कामराची तिखट प्रतिक्रिया!

राहुल गांधींची खासदारकी रद्द होताच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे.
Rahul Gandhi Disqualified
Rahul Gandhi Disqualified esakal
Updated on

Rahul Gandhi Disqualified Kunal Kamra tweet : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा फटका कॉग्रेसच्या राहुल गांधींना बसल्याचे दिसून आले आहे. गुजरातच्या न्यायालयानं त्यांना सुरुवातीला दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता राहुल गांधीची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

थोड्यावेळापूर्वी बीजेपीची जी पत्रकार परिषद झाली आहे त्यामध्ये भाजपचे धर्मेंद्र प्रधान यांनी कॉग्रेसला न्यायालयाचा आदर नसल्याचे सांगत त्यांनी कायमच कायदयाचा अनादर केल्याचे म्हटले आहे. अनुराग ठाकूर यांनी तर भगवान के घर देर है लेकीन अंधेर नही असे म्हणत राहुल गांधींवर टोकदार प्रतिक्रिया दिली आहे.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

राहुल गांधींची खासदारकी रद्द होताच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. यासगळ्यात सध्या अभिनेत्री स्वरा भास्करची प्रतिक्रिया चर्चेत आहे. तिनं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांनी राहुल गांधी यांना पप्पु असे म्हटले ते सगळे त्यांनाच घाबरल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या भारत जोडो यात्रेला मिळालेला प्रतिसादही अनेकांना घाबरवून टाकणारा होता.

Rahul Gandhi Disqualified
Rahul Gandhi : 'आरंभ है प्रचंड!' खासदारकी गमावली

स्वराच्या प्रतिक्रियेनंतर प्रसिद्ध कॉमेडियन आणि आपल्या तिरकस शैलीतील टोमणेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कुणाल कामराचे ट्विट व्हायरल झाले आहे. त्यांनी यावेळी गुजरात आणि गुजरात मधील न्यायालयं यांच्यावर परखड शब्दांत टीका केली आहे. गुजरात मधील न्यायालयं ही बीजेपीचे अधिकृत लिगल सेल असल्याचे म्हटले आहे. त्याच्या या ट्विटला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

Rahul Gandhi Disqualified
Swara Bhasker : लाहोरहून बरेलीला आला स्वराचा लेहेंगा, एकदा पाहाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.