ब्रेन स्ट्रोकनंतर राहुल रॉयचा कोरोनाशी सामना; कुटुंबीयसुद्धा पॉझिटिव्ह

'घराबाहेर पडलोच नाही तरी आम्हाला कोरोना कसा झाला', राहुल रॉयला पडला प्रश्न
Rahul Roy
Rahul RoyInstagram, Rahul Roy
Updated on

अभिनेता राहुल रॉयसह त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बहीण प्रियांका रॉय आणि मेहुणा रोमीर सेन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्याने दिली. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित राहुलने याबद्दल सांगितलं. 'क्वारंटाइन दिवस १९. माझी कोव्हिड स्टोरी. मी राहत असलेल्या इमारतीतील माझा संपूर्ण मजला २७ मार्च रोजी सील करण्यात आला. आमच्या शेजारचे कोव्हिड पॉझिटिव्ह आल्यानंतर मजल्यावर राहणाऱ्या आम्ही सर्वांनी १४ दिवस स्वत:च्या फ्लॅट्समध्येच क्वारंटाइनमध्ये राहतोय. मी आणि माझ्या कुटुंबीयांना ११ एप्रिल रोजी दिल्लीला जायचं होतं. त्यामुळे ७ एप्रिल रोजी आम्ही RTPCR टेस्ट केली असता १० एप्रिल रोजी आलेल्या रिपोर्ट्समध्ये आम्ही सर्वजण पॉझिटिव्ह आलो', असं त्याने लिहिलं.

राहुल रॉय आणि इतर त्याच्या कुटुंबीयांना कोरोनाची कोणतीच लक्षणे नव्हती असं त्याने सांगितलं. "आम्हा कोणालाच लक्षणे नव्हती आणि त्याच दिवशी मुंबई महापालिकेकडून सोसायटीमधल्या सर्वांची अँटिजन टेस्ट होणार असल्याचं आम्हाला समजलं. त्या चाचणीत आम्हा सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. अँटिजन टेस्ट केल्याच्या थोड्याच वेळानंतर आम्ही RTPCR टेस्ट केली. मात्र त्याचे रिपोर्ट्स अजून आम्हाला मिळालेले नाहीत. महापालिकेकडून आमचं घर सॅनिटाइज करण्यात आलं आणि डॉक्टरांनी आम्हाला काही विचित्र प्रश्न विचारले. माझ्या कुटुंबाचा व्यवसाय काय आहे, ऑफिस कुठे आहे, प्रवास कुठे करायचा आहे. या सर्वांचा काय संबंध आहे काय माहित? मला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र कोणतीच लक्षणे नसल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी सतत ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यास आणि औषधं घेण्यास सांगितलं. ब्रेन स्ट्रोकवरील उपचार झाल्यानंतर रुग्णालयातून घरी आल्यापासून मी हेच करतोय", असं तो पुढे म्हणाला.

हेही वाचा : व्हॅक्सिन घेऊनही आशुतोष राणाला झाला कोरोना; पोस्ट व्हायरल

घरातून बाहेर न पडूनही कुटुंबातील लोकांना कोरोना कसा झाला, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. याबद्दल पुढे लिहिलं, "मी आणि माझे कुटुंबीय घराबाहेर पडले नाहीत, बाहेरील व्यक्तींच्या संपर्कात आले नाहीत आणि बाहेर जॉगिंगसाठीही कधी गेले नाहीत तरी आम्हाला कोरोनाची लागण कशी झाली? माझी बहीण प्रियांका ही योगिनी असून तिने श्वासोच्छवासाच्या प्राचीन तंत्रांचा अभ्यास केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ती घराबाहेर पडली नाही आणि तरीही कोणत्याही लक्षणांशिवाय तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला." या पोस्टच्या अखेरीस राहुल रॉयने चाहत्यांनाही कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन केलं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राहुलला ब्रेन स्ट्रोकमुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांच्या उपचारानंतर जानेवारीमध्ये त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.