रेल्वे अनुदान बंद केल्याने काॅमेडियन संतापला; म्हणाला, मोदींना...

मोदीजी, भारत सरकारकडे देशातील ज्येष्ठांसाठी पैसे नाहीत का? मात्र खासदार आणि मंत्र्यांचे रेल्वेकडून मिळणारे अनुदान सुरु आहेत.
Rajeev Nigam And Narendra Modi
Rajeev Nigam And Narendra Modi esakal
Updated on

रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे अनुदान बंद (Railway Subsidy) केले आहे. या मुद्द्यावरुन आता वाद सुरु झाला आहे. सोशल मीडियावर लोकांनी रेल्वे खात्याच्या या निर्णयावर टीका केली आहे. या दरम्यान काॅमेडियन राजीव निगमने (Rajeev Nigam) नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राजीव निगम ट्विट करुन म्हणतो, जो व्यक्ती सक्षम असूनही आपल्या वयस्कर आईला रांगेत उभा करु शकतो, त्यांना देशातील इतर ज्येष्ठांविषयी कशाला राहील मोह? ज्येष्ठांच्या रेल्वे भाड्यात अनुदान बंद करुन ज्येष्ठ नागरिकांबरोबर हे कसले न्याय आहे? (Railway Stopped Subsidy Of Elderly People, Comedian Criticize On PM Modi)

Rajeev Nigam And Narendra Modi
Parineeti Chopra : परिणीती अन् प्रियंकाची धमाल पार्टी !

यावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. संजय कुमार नावाचा युजर म्हणतो, देशाचे पंतप्रधान असून वयस्कर आईला रांगेत उभा केले. या निष्ठूर आणि निर्मम व्यक्तीला एका ज्येष्ठाचे दुःख काय कळणार? सत्तेचा इतका मोह या वयात आहे, तर पुढे काय करणार माहीत नाही. मोदीजी (Narendra Modi) असे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना इतर ज्येष्ठांची पीडा कळत नाही. कारण त्यांना तर सरकारच्या वतीने मोफत रेवड्या मिळतात, असा टोला दुसऱ्या एका युजरने लगावला.

Rajeev Nigam And Narendra Modi
हाॅलीवूड अभिनेत्री रणबीर कपूरवर रागवली होती, कारण...

आप उत्तर प्रदेशने म्हटले आहे, की मोदी सरकारने रेल्वेत ज्येष्ठांना मिळणारे अनुदान बंद करुन देशातील ज्येष्ठांना छळण्याचे काम केले आहे. मोदीजी, भारत सरकारकडे देशातील ज्येष्ठांसाठी पैसे नाहीत का? जेव्हा खासदार आणि मंत्र्यांचे रेल्वेकडून मिळणारे अनुदान सुरु आहेत तर ज्येष्ठांसाठी का नाही? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी नुकतेच संसदेत माहिती देताना म्हणाले होते, की अनुदानामुळे रेल्वेवर मोठा बोझा पडतो. त्यांनी अनुदान देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()