'नीरव मोदी, मेहूल चोक्सीप्रमाणं राज पळून गेला तर'...

बॉलीवूडची bollywood अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा shilpa shetty पती आणि उद्योगपती राज कुंद्रानं raj kundra आतापर्यत तीनवेळा जामीनासाठी अर्ज केला
raj kundra
raj kundra
Updated on

बॉलीवूडची bollywood अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा shilpa shetty पती आणि उद्योगपती राज कुंद्रानं raj kundra आतापर्यत तीनवेळा जामीनासाठी अर्ज केला. मात्र न्यायालयानं तो अर्ज फेटाळून लावला. पतीला जामीन मिळावा यासाठी शिल्पाची खटपट सुरु आहे. मात्र कुंद्राच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. यापूर्वीच मुंबई पोलिसांनी जेव्हा त्याला अटक केली तेव्हा सांगितले होते की आमच्याकडे त्याच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासातून दररोज वेगवेगळ्या गोष्टी पोलिसांच्या हाती लागत आहे. त्यामुळे राजच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आताही पोलिसांनी त्याच्या जामीन न देण्यावर न्यायालयाला काही कारणं दिली आहेत. ती ग्राह्य धरुन त्याला जामीन देण्यास न्यायालयानं नकार दिला आहे.

पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार करणं आणि ते एका अॅप्लिकेशनच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेयर करणं यामुळे त्याला मुंबई क्राईम ब्रँचन राजला अटक केली होती. त्यानंतर त्याची पत्नीची चौकशी करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका कंपनीची सुरुवात करताना शिल्पा आणि तिच्या आईनं लोकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी लखनऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे शेट्टी आणि कुंद्रा कुटूंबीय कायद्याच्या कचाट्य़ात सापडले आहे.

राजच्या वकिलांनी जेव्हा न्यायालयाला राजला जामीन द्यावा अशी विनंती केली तेव्हा त्याला मुंबई पोलिसांनी हरकत घेतली. त्यांनी कारणं देताना सांगितले की, जर राजला जामीन दिला तर तो कदाचित नीरव मोदी, मेहूल चोक्सीप्रमाणं देश सोडून जाण्याची शक्यता आहे. पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार करण्याचा गंभीर आरोप राजवर करण्यात आला आहे. याप्रकरणात तो मास्टरमाईंड असल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे त्याला जामीन नाकारण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

raj kundra
सकाळ एज्यु एक्स्पो 2021 : आजचा व्याख्यानाचा विषय, वक्ते जाणून घ्या

परदेशातही राजच्या या पॉर्नोग्राफी प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. पोलिसांनी आणखी एक बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. ती म्हणजे, राजला कुंद्राला जामीन नाकारण्यात यावा. याचे कारण म्हणजे त्याच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व आहे. आणि त्याला जामीन मिळाला तर तो त्या देशात जाण्याची शक्यता आहे. जामीन मिळताच तो फरार होण्याची शक्यताही पोलिसांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.