Raj Kundra: बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या पॉर्न सिनेमाच्या केस प्रकरणात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आपली चार्जशीट दाखल केली आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की राज कुंद्रा कही इतर लोकांच्या सहकार्याने डील्क्स हॉटेल्समध्ये पोर्नोग्राफी कॉन्टेंट असलेले सिनेमे बनवत होता, ज्यांना नंतर कमाईसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मला विकलं जायचं. पोलिसांद्वारा गेल्या आठवड्यात कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटनुसार राज कुंद्रानं दोन हॉटेल्समध्ये शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे सारख्या मॉडेल्ससोबत अश्लील आणि पॉर्न सिनेमांचे शूट केले होते.(Raj Kundra Made Adult Films for OTT Platform, Mumabai Police files chargesheet)
याआधी २०२१ मध्ये मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने एक वेगळी चार्जशीट दाखल केली होती, ज्यानंतर सप्टेंबर महिन्यात आणखी एक चार्जशीट दाखल केली गेली. हे सगळं प्रकरण फेब्रुवारी २०२१ मध्ये मढ आयलंडमधील एका बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर उजेडात आले होते. २०१९ मध्ये सायबर पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणात दावा केला गेला होता की Aemsprime Media Ltd. चे संचालक काही वेबसाईट्ससाठी अश्लील व्हिडीओ बनवण्यासाठी आणि त्याच्या डिस्ट्रिब्युशनसाठी जबाबदार आहेत.
पोलिसांनी ४५० पानाच्या चार्जशीटमध्ये राज कुंद्रा व्यतिरिक्त Banana Prime OTT चा सुवाजीत चौधरी आणि राजचा एक स्टाफ मेंबर उमेश कामतचे नाव दाखल केले आहे, ज्यांच्यावर 'प्रेम पगलानी' नावाची एक सीरिज बनण्याचा आणि त्याला ओटीटी वर अपलोड करण्याचा आरोप आहे. पूनम पांडे देखील स्वतःचा अशापद्धतीचा एक अश्लील व्हिडीओ शूट करण्यात आरोपी आहे. पूनम पांडेवर आरोप लावला गेला आहे की तिनं कुंद्राच्या कंपनीच्या मदतीनं हा व्हिडीओ शूट केला,त्यानंतर अपलोड आणि सर्कुलेट केला होता.
सायबर पोलिसांच्या म्हणण्यानुसार दुबेने शर्लिन चोप्राचे व्हिडीओ शूट केले होते आणि झुनझुनवाला या प्रकरणात स्क्रिप्टिंग आणि दिग्दर्श करण्यासाठी आरोपी आहे.पोलिसांचा आरोप आहे की राज कुंद्राच्या कंपनीने पूनम पांडेला अश्लील व्हिडीओ बनवण्यात मदत केली आणि अधिक व्हिडीओ बनवण्यासाठी तिच्यामागे धोशा लावला,तिला पैशाची लालच दिली. यामुळे पूनम सोबतच कुंद्रा आणि त्यात सहकार्य करणाऱ्या सगळयांनाच मोठा आर्थिक फायदा होणार होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.