राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा ही सध्या चर्चेचे विषय झाले आहेत. दोघीही एकमेकांवर वाटेल ते आरोप करत आहेत. जेव्हा पासून साजिद खान बिग बॉस १६ घरात गेला आहे तेव्हापासून शर्लिन चोप्राचे रक्त खवळले आहे. तिने साजिद विरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. तर साजिद खानच्या समर्थनार्थ राखी सावंत मैदानात उतरली आहे. या दोघींकही भांडणं इतकी टोकाला गेली आहेत की शर्लिनच्या पोर्न व्हिडिओज माझ्याकडे आहेत असा आरोप राखीने केला होता. आता याबाबत शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रानेही मोठा खुलासा केला आहे.
शर्लिन चोप्राच्या मागे लागलेले ग्रहण काही सुटत नाहीय. राखी सावंत नंतर आता तिच्या विरूद्धात आता राज कुंद्रानेही ग्वाही दिली आहे. राज कुंद्राने अलीकडेच शर्लिन चोप्रावर मानहानीचा दावा दाखल केला. राज कुंद्राने ट्विट करत शर्लिन चोप्राचे गुपित उघड केले आहे.
(Raj Kundra says Sherlyn Chopra will be arrested soon for 'producing filth x rated contend' on OnlyFans)
या ट्विटमध्ये राज म्हणतो, 'जी शर्लिन असभ्यता, अश्लीलता आणि महिलांच्या हक्कांबद्दल बोलत आहे ती स्वतःच समाजासाठी धोकादायक आहे. 'ओन्ली फॅन्स' या साईटसाठी ती स्वतः अश्लील चित्रफितींची निर्मिती करते. हे सत्य समोर येऊन लवकरच तिला अटक केली जाईल. ती समाजासाठी अत्यंत घातक आहे.'
शर्लिनने ऑक्टोबर 2021 मध्ये राज कुंद्रा आणि पत्नी शिल्पा शेट्टीविरोधात तक्रार दाखल केली होती. दोघांवर गुन्हा आणि मानसिक छळाचे आरोप ठेवण्यात आले होते. राजला पॉर्नोग्राफिक व्हिडिओ तयार करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. राज आणि शिल्पाने शर्लिनवर 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. शर्लिने जाहीर माफी मागावी अशीही मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.