Raj Kundra shilpa shetty husband UT 69 Social media emotional : राज कुंद्रा कोण हे आता नव्यानं सांगण्याची गरज नाही. भलेही तो मोठा उद्योगपती असेल पण त्याची ओळख शिल्पा शेट्टीचा पती म्हणूनच जास्त असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षापासून राज हा वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आला आहे. आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पॉर्नोग्राफी व्हिडिओ प्रकरणात जेलची हवा खाऊन आलेल्या राज कुंद्रामुळे शिल्पाला खूपच मानसिक त्रास सहन करावा लागला होता. तिला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. सोशल मीडियावरुन शिल्पाला नेटकऱ्यांची बोलणी सहन करावी लागत होती. त्यामुळेच की काय तिनं काही महिने ब्रेकही घेतला होता. पतीमुळे आपल्याला ट्रोल करु नका.असे आवाहनही तिनं नेटकऱ्यांना केले होते.
Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?
या सगळ्यात आता शिल्पाचा पती राज कुंद्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या व्हिडिओतून तो नेटकऱ्यांना आणि प्रेक्षकांना काही आवाहन करताना दिसतो आहे. ते आवाहन करत असताना राज कमालीचा भावूक झाल्याचे दिसून आले आहे. काहीही करा पण माझी पत्नी आणि मुलांना काही बोलू नका.मला हवं ते बोला असं म्हटले आहे.
जेव्हापासून राजच्या बाबत ते पॉर्नोग्राफी व्हिडिओ प्रकरण घडले तेव्हापासून तो मास्क लावून फिरत असल्याचे व्हिडिओ समोर आले होते. कोणत्याही ठिकाणी गेल्यास राजचा मास्कवाला व्हिडिओ व्हायरल होत असे. त्यामुळे त्याला कित्येकदा ट्रोलही व्हावे लागले आहे. तो त्या व्हिडिओतून खूपच भावूक झाल्याचे दिसून येत आहे.
राजच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे झाल्यास तो, UT69 नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. जो तीन नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रमोशनच्या निमित्तानं एक व्हिडिओ शेयर केला होता. ज्यात राजशिवाय फराह खान आणि मुनव्वर फारुखी दिसले होते. तो व्हिडिओ चर्चेचा विषय झाला होता. त्यातून फराहनं राजवर शेलक टिप्पणी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.