Salim-Javed : 'कशाला गरीब लेखकांची चेष्टा करता राव'! सलीम-जावेद यांनी घेतली रितेशची शाळा

यावेळी प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांनी सलीम -जावेद यांच्याशी संवाद साधला.
Salim-Javed : 'कशाला गरीब लेखकांची चेष्टा करता राव'! सलीम-जावेद यांनी घेतली रितेशची शाळा
Updated on

Raj Thackeray Diwali Function Inauguration Salim Javed Interview : एक दोन नव्हे तर तब्बल चार दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीनं बॉलीवूडमधील प्रेक्षकांवर अधिराज्य करणाऱ्या सलीम -जावेद यांची लोकप्रियता कायम आहे. आजही या पटकथाकारांचे चित्रपट मोठ्या आवडीनं पाहिले जातात. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दीपोत्सवाचे उद्धघाटन प्रसिद्ध पटकथाकार सलीम जावेद यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांनी सलीम जावेद यांच्याशी संवाद साधला. दरम्यान जावेद अख्तर यांनी त्यांच्या लखनौमधील आठवणी ते बॉलीवूडमधील संघर्षमय काळ यावर वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणी सांगून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यात त्यांनी सध्याच्या काळातील सांस्कृतिक वातावरण आणि लेखकांवर असणारी बंधनं याविषयी देखील सडेतोडपणे भाष्य केले.

Salim-Javed : 'कशाला गरीब लेखकांची चेष्टा करता राव'! सलीम-जावेद यांनी घेतली रितेशची शाळा
Salman Khan Reaction On Aishwarya Rai : 'मी जर खरचं ऐश्वर्याला मारलं असतं तर...' अखेर सलमाननं 'त्या' गोष्टीवर सोडलं मौन!

सलीम यांनी देखील आपल्याकडे ज्या कथा आल्या त्यांना पूर्ण न्याय देण्याचे काम केले असे सांगत बॉलीवूडला विविध कलाकार देता आला याचा आनंद आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान रितेश देशमुख यांनी बॉलीवूडमधील सर्वात महागडे पटकथाकार म्हणून सलीम जावेद यांच्या नावाचा उल्लेख केला. दरम्यान रितेशनं त्यावेळी या दोन्ही सेलिब्रेटींना जे मानधन मिळाले त्याची आकडेवारीही सांगितले.

त्यावेळी जावेद अख्तर आणि सलीम यांना दहा लाखांहून अधिक मानधन मिळाले होते. आणखी एका चित्रपटाचा उल्लेख करुन त्यात पुन्हा मिळालेल्या पैशांचा आकडेवारी रितेशनं सांगितले तेव्हा जावेदजींनी तुम्ही म्हणताय जर तसे झाले असते तर खूपच चांगलं घडलं असतं. पण एवढे पैसे मिळाले नाहीत. आताच्या घडीला लेखकांना चांगले पैसे मिळत नाहीत. पण अभिनेत्यांना मिळतात. मात्र तेव्हा आम्हाला इतरांच्या तुलनेत चांगले पैसे मिळत होते.

रितेशच्या प्रश्नावर जावेद म्हणाले की, तुम्ही आम्हाला किती पैसे मिळाले हे सगळ्यांसमोर विचारुन आमच्या मागे ईडीचा ससेमिरा लावता आहात काय, तसेच आमच्यासारख्या गरीब लेखकांची का चेष्टा करत आहात तुम्ही...असं म्हणत जावेद अख्तर यांनी रितेशची शाळा घेतली. त्याला उपस्थितांनी देखील टाळयांच्या कडकडाटात दाद दिली.

Salim-Javed : 'कशाला गरीब लेखकांची चेष्टा करता राव'! सलीम-जावेद यांनी घेतली रितेशची शाळा
Shah Rukh Khan : किंग खान कोणत्या सेलिब्रेटींना म्हणतो बेटा अन् कुठल्या अभिनेत्रीला म्हणतो आई?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.