Raj Thackeray: कोण लता? राज ठाकरेंनी सांगितली लता मंगेशकरांची खास आठवण

राज ठाकरेंनी १०० व्या नाट्यसंमेलनात लता मंगेशकरांची खास आठवण सांगितली आहे
Raj Thackeray
Raj Thackeray
Updated on

Raj Thackeray: सध्या पुण्यात १०० वं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन सुरु आहे. या नाट्यसंमेलनात राज ठाकरे प्रमुख पाहूणे उपस्थित होते. यावेळी अभिनेते दीपक करंजीकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली.

राज ठाकरेंनी यावेळी मराठी कलाकार एकमेकांना टोपणनावाने हाक मारतात, यावरुन खडे बोल सुनावले. याच मुलाखतीत राज ठाकरेंनी लता मंगेशकरांची खास आठवण सांगितली आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray : 'यापुढील काळात तुम्ही...' राज ठाकरेंच्या मराठी कलाकारांना 'कानपिचक्या'!

यावेळी लता मंगेशकरांची आठवण सांगताना राज ठाकरे म्हणाले. एकदा मला त्यांचा फोन आला. त्या म्हणाल्या मी लता बोलतेय? मी म्हटलं कोण लता? आता मला लता मंगशेकरांचा फोन आलाय हे कसं कळणार.

लतादीदी मला मुलाप्रमाणे मानायच्या. त्यांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं. मी लतादीदींच्या पुस्तकावर काम करतोय.

Raj Thackeray
Vighnesh Shivan LIC: विघ्नेश शिवनचा आगामी प्रोजेक्ट वादात अडकला, विमा कंपनीने पाठवली नोटीस

लतादीदी मला म्हणाल्या होत्या की पुर्वीच्या काळी गीतकार जे गाणं लिहायचे त्यांचं अक्षर त्यांना कळायचं नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या हाताने ती गाणी लिहून घेतली. या गाण्यांची एक वही त्यांच्याकडे होती. ती त्यांनी मला दाखवली. मला हा फार मोठा ऐवज वाटला. मी त्या पुस्तकाचं पहिलं डिझाईन केलं आणि त्यांना दाखवलं. त्यांनी मला कौतुकाने शाबासकीची थाप दिली.

चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुलात उभारलेल्या सूर्यमाला व्यासपीठावर शंभरावं नाट्य संमेलन पार पडत आहे. यावेळी राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी अनेक वेगवेगळ्या मुद्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी मराठी कलाकारांवरही टीका केली. त्यांची बोलण्याची पद्धत आणि त्यांचे एकमेकांना बोलणे यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.