Raj Thackeray-Atul Parchure: कशी होती राज अन् अतुल परचुरेंची मैत्री? ऐकून डोळ्यात येईल पाणी!

अतुल परचुरे यांना कॅन्सर झाल्याचं वर्षभरापूर्वी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर राज ठाकरेंसोबत असलेलं त्यांचं निखळ मैत्रीची सर्वांना ओळख झाली होती.
Atul Parchure Viral Video
Atul Parchure Viral Videoesakal
Updated on

Atul Parchure Viral Video : मराठी चित्रपट नाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांची कर्करोगाशी झुंज आज अखेर संपली. वर्षभर त्यांनी या आजारीशी धीरानं आणि खंबीरपणे मुकाबला केला होता. वर्षभरापूर्वी जेव्हा त्यांना कर्करोगाचं निदान झाल्याचं समोर आलं तेव्हा अनेक मराठी सेलिब्रेटींनी देखील अतुल यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली होती. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अतुल परचुरे यांच्यातील मैत्रीचा अनोखा बंध समोर आला होता.

अतुल परचुरे यांना कर्करोगाचं निदान झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी 'मित्र म्हणे' या पॉडकास्टमध्ये आपल्या प्रकृतीविषयमी माहिती दिली होती. यामध्येच त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख केला. अतुल परचुरे आणि राज हे शाळेत असल्यापासूनचे मित्र होते. पुढे महाविद्यालयात गेल्यानंतरही त्यांची मैत्री कायम राहिली होती.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

Atul Parchure Viral Video
Atul Parchure Passed Away: मराठी रंगभूमीवरचा हरहुन्नरी तारा निखळला! अभिनेते अतुल परचुरे यांचे ५७ व्या वर्षी निधन

अतुल म्हणाले होते, "राज आणि माझी घट्ट मैत्री आहे. त्याला जेव्हा माझ्या आजारपणाविषयी सांगितले तेव्हा तो मला म्हणाला की, मी आहे ना, बस्स एवढेच त्याचे शब्द होते. पुढे आजारातून सावरल्यानंतर तोच म्हणाला मी तुला भेटायला येतो. राजच्या त्या शब्दानं मला खूप आधार आला. राजविषयी आणखी काही सांगायचे म्हणजे, तो एकदम यारो का यार असणारा व्यक्ती आहे"

राज मला तीन ते चारवेळा भेटूनही गेला. कुणीतरी आहे हे आपल्या बॅक ऑफ द माईंड असणे महत्वाची गोष्ट आहे. राजमध्ये खूप क्षमता आहे. त्याला मी शाळेत असल्यापासून ओळखतो. तो माझा खूपच जवळचा मित्र आहे. तो आता एक नेता आहे. त्याच्याकडे वेगळे व्हिजन आहे. राज आता एकटा आहे. आता त्याला ताकद देण्याची गरज आहे. अशा शब्दांत अतुल यांनी मित्राविषयीच्या आठवणींना उजाळा दिला होता.

Atul Parchure Viral Video
अतुल परचुरे यांच्या आजारपणात नाना पाटेकरांनी केलेला सोनियाला फोन; मित्रासाठी केलेली खास गोष्ट, म्हणालेले- काहीही...

त्यावेळी अतुल यांना राज यांच्या राजकीय भवितव्याविषयी प्रश्न त्या मुलाखतीतून विचारला गेला. तेव्हा ते म्हणाले की, "मला एक गोष्ट त्याच्याविषयी सांगावीशी वाटते ती म्हणजे, त्याला सध्या जे काही चाललं ते बदलण्याची खूप इच्छा आहे. त्यासाठी त्याला आपल्या पाठींब्याची गरज आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.