Ajmer 92 Movie : अजमेर 92 प्रदर्शित होणार, राजस्थान कोर्टानं याचिकाकर्त्यांना फटकारले!

Ajmer 92 हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असून त्याच्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका राजस्थान उच्च न्यायालयात करण्यात आली होती.
Rajasthan High Court dismisses Plea seeking ban Film Ajmer 92
Rajasthan High Court dismisses Plea seeking ban Film Ajmer 92esakal
Updated on

Rajasthan High Court dismisses Plea seeking ban Film Ajmer 92 : मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी आता समोर येत आहे. ती म्हणजे राजस्थानमधील अजमेरमध्ये येथे घडलेल्या त्या घटनेवर आधारित अजमेर ९२ चित्रपटाबाबत कोर्टानं मोठा निर्णय दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. अखेर कोर्टानं मेकर्सला चांगलेच झापले आहे.

१९९२ साली अश्लील फोटो आणि ब्लॅकमेल प्रकरण म्हणून देशासमोर आलेल्या या घटनेनं अनेकांना हादरा दिला होता. त्यावर आता बॉलीवूडमध्ये चित्रपट तयार करण्यात आला असून तो येत्या १४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असून त्याच्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका राजस्थान उच्च न्यायालयात करण्यात आली होती.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

राजस्थान उच्च न्यायालयानं ती याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टानं या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले आहे की, चित्रपटावर चर्चा करण्यासाठी कित्येक वेगवेगळ्या प्रकारचे मंच आहेत. त्यामुळे न्यायालयानं त्यात दखल देण्यासारखे काही नाही. अंजूमन मोईनिया चितिश्या खुद्दाम ख्वाजा यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला होता. त्यावरुन वादही झाल्याचे समोर आले होते.

ट्रेलरमध्ये अजमेर दर्गाह आणि चिश्ती समुदाय हे एकत्रित दाखवण्यात आले आहे. असे त्या याचिकेमध्ये म्हटले आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर ती घटना त्या दर्गामध्ये घडली होती. असे वाटते. यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. आणि सगळे आरोपी हे चिश्ती समुदायाचे आहेत असे वाटते. यासगळ्यात राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिटीची स्थापना करण्यात यावी. असे सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.