Tv Entertainment News: टीव्ही मनोरंजन विश्वातील वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे सोनी वाहिनीवरील कॉमेडी शो स्पर्धेचा निकाल आता समोर आला आहे. इंडियाज लाफ्टर चॅलेंजमध्ये कोण (Indias laughter champion) विजेतेपद मिळवणार याविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. त्याच्या निकालाविषयी चाहत्यांना कुतूहल होते. दिल्लीच्या रजत सुदनं अखेर विजेतेपद मिळवले आहे. टॉप 5 फायनलिस्ट्मध्ये तो पोहचला होता. (social media viral news) त्याचवेळी त्याच्या चाहत्यांनी यंदाच्या सीझनमध्ये तो विजेता होणार असं सांगितलं जातं होतं.
टॉप फायनलिस्टमध्ये मुंबईचा नितेश शेट्टी, जय विजय सचान, विघ्नेश पांडे, उज्जैनमधून हिमांशु बावंदर आणि दिल्लीतून रजत सुद यांच्यामध्ये काट्याची टक्कर होती. त्यात रजतनं विजय मिळवला आहे. त्याच्या सादरीकरणाला, हजरजबाबीपणाला आणि विनोदाच्या अनोख्या शैलीला चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्याला भरघोस मतदान करुन त्याला विजय मिळवून दिला आहे. रजत विजयी होताच सोशल मीडियावरुन त्याच्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव सुरु केला आहे. त्याचे कौतूक केले आहे. त्याच्या या विजेतेपदाच्या सोहळ्यासाठी लायगरची टीम हजर असल्याचे दिसून आले.
इंडियाज लाफ्टर चँलेजचे जज अर्चना पुरन सिंग आणि शेखर सुमन यांनी रजतला ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला आहे. यावेळी त्याला 25 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. मुंबईच्या नितेश शेट्टीला फर्स्ट रनर अप तर विजय सचान आणि विघ्नेश पांडेला सेकंड रनर अप म्हणून घोषित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्पर्धकांनी नेटकऱ्यांचे निखळ मनोरंजन केले. त्यांच्यातील स्पर्धा चुरशीची झाल्याचे दिसून आले. त्यामुळे विजेता कोण होणार याविषयी नेटकऱ्यांना कुतूहल होते.
विजेत्यांचे कौतूक करताना शेखर सुमन म्हणाले, रजतनं केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे. त्याचे टायमिंग अफलातून आहे. त्याचा विनोद निखळ आहे. त्यानं खूप आनंद दिला. प्रेक्षकांना खळखळून हसवले. अर्चनानं त्याच्या कॉमेडी अंदाजाचे कौतूक केले. रजतनं वेगवेगळ्या प्रकारे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्याकडे आकर्षित करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्याला यश मिळालं. असं तिनं यावेळी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.