Rajeev Khandelwar : 'महिलांचे ठीक आहे, पुरुषांनी काय करायचं'? कास्टिंग काऊचवर प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

बॉलीवूडमधील कास्टिंग काऊचवर यापूर्वी अनेक सेलिब्रेटींनी आपआपली मतं मांडली आहे.
Rajeev Khandelwar
Rajeev Khandelwaresakal
Updated on

Rajeev Khandelwar Casting Couch Challenges : बॉलीवूडमधील कास्टिंग काऊचवर यापूर्वी अनेक सेलिब्रेटींनी आपआपली मतं मांडली आहे. नुकतेच प्रसिद्ध अभिनेत्री शोभिता धुलिपाला नावाच्या अभिनेत्रीनं आपल्याला रंगामुळे, दिसण्यामुळे वेगळ्याच वादाला सामोरं जावं लागलं होतं. सावळं दिसणं म्हणजे मोठा गुन्हा आहे की काय अशा शब्दांत तिनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यापूर्वी देखील बॉलीवूडमधील कास्टिंग काऊचमधील वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. अशावेळी अनेकांना त्यांना त्याविषयी माहिती नसल्यानं त्याच्या अपप्रचार होत असल्याचे दिसून आले आहे. आता प्रसिद्ध अभिनेता राजीव खंडेलवाल यानं देखील जी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे. राजीवनं एक गोष्ट मान्य केली आहे की, केवळ अभिनेत्रीच नाही तर अभिनेत्यांना देखील वेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागलं आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

कास्टिंग काऊच होतं हे मान्य करायला हवं. आणि हे बॉलीवूडमधील सत्य गोष्ट आहे. मात्र ही गोष्ट केवळ महिला अभिनेत्रीपुरतीच सीमित नाही. त्यात पुरुष कलाकारांचाही देखील समावेश आहे. यावेळी राजीवनं बॉलीवूडमध्ये कलाकारांना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागत आहे याविषयी काही धक्कादायक बाबी मांडल्या आहेत. ज्या अभिनेत्यांची शाररिक स्थिती चांगली आहे असे कलाकार दुसऱ्या पुरुष कलाकारांचे शोषण करु शकतात.

Rajeev Khandelwar
Adipurush Nepal: नेपाळमध्ये आदिपुरुषवरील बंदी उठवली, मात्र काठमांडूचे महापौर काही ऐकेना..

दरवेळी महिला अभिनेत्रींचे शोषणाविषयी सांगण्यात येते. यात पुरुष कलाकारांचे नाव कुठेही येत नाही. आणि त्याविषयी काहीही बोलले जात नाही. पुरुष कलाकारांना वेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागत असल्याचे दिसून येते. मात्र त्याविषयी अनेकांना माहिती नाही. मला देखील बॉलीवूडमध्ये काही गोष्टी मॅनेज कराव्या लागल्या आहेत. असेही राजीवनं यावेळी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.