अभिनेता-निर्माता (Actor-Producer) निखिल द्विवेदी (Nikhil Dwivedi) यांनी मंगळवारी दिग्गज बॉलिवूड स्टार (Bollywood star) राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्या चाहत्यांना एक खास भेट दिली. राजेश खन्ना यांच्या 79 व्या जयंतीदिनाच्या (Birth anniverssary) पूर्वसंध्येला, निखिलने हिंदी सिनेमाच्या मूळ सुपरस्टारवर बायोपिकची (Biopic) घोषणा केली.
चित्रपटासाठी, निखिल द्विवेदी यांनी गौतम चिंतामणीच्या (Guatam Chintamani) बेस्ट सेलिंग पुस्तक, डार्क स्टार: द लोनलीनेस ऑफ बीइंग राजेश खन्ना (Dark star: The loneliness of being Rajesh Khanna) चे हक्क विकत घेतले आहेत. हा बायोपिक दिग्दर्शिका (Director) फराह खान (Farah Khan) दिग्दर्शित करणार असून ती गौतम चिंतामणीसोबत त्याची स्क्रिप्ट (Script) देखील करेल.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी बोलताना निखिल म्हणाला, “होय, मी गौतम चिंतामणीच्या पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहेत, डार्क स्टार आणि मी हा चित्रपट बनवण्यासाठी फराह खानशी बोलणी करत आहे. मी सध्या एवढेच सांगू शकतो. जेव्हा केव्हा कोणतीही मोठी घटना घडेल तेव्हा मला सामायिक करण्यात नक्कीच आनंद होईल कारण मी राजेश खन्ना यांची कथा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी खूप उत्सुक आहे.”
फराह खान म्हणाली, “होय मी गौतमचे पुस्तक वाचले आहे आणि ते खूप आकर्षक आहे. नक्कीच एक रोमांचक कथा आहे. आम्ही यावर चर्चा करत आहोत पण मी अधिक भाष्य करू शकत नाही.”
राजेश खन्ना यांनी चेतन आनंद (Chetan Aanad) दिग्दर्शित आखरी खत (Akhiri khat) (1966) सोबत चित्रपटांमध्ये प्रवेश केला. त्यांनी लवकरच सुपरस्टारडम (Superstardom) गाठले आणि आराधना (Aradhana), इत्तेफाक (Ittefaq), सच्चा झुठा (Sachaa Jhutha), कटी पतंग (Kati Patang), आन मिलो सजना (Aan Milo Sajna), आनंद (Anand), दुश्मन (Dushman), अमर प्रेम (Amar Prem), बावर्ची (Bawarchi), दाग (Daag), नमक हराम (Namak Haraam) आणि बरेच काही यासारखे ब्लॉकबस्टर दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.